घरमहाराष्ट्रनागपूरKunal Raut : मोदींच्या पोस्टर्सला काळे फासणे भोवले, कुणाल राऊतला दोन दिवसांची...

Kunal Raut : मोदींच्या पोस्टर्सला काळे फासणे भोवले, कुणाल राऊतला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Subscribe

काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याला नागपूर पोलिसांनी अटक केली असून नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याला नागपूर पोलिसांनी अटक केली असून नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सला काळे लावल्याने आणि त्यांची भारत हा शब्द खोडल्याने केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी कुणाल राऊत याने आपल्या साथीदारांसह हे पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले होते. त्यानंतर त्याने मोदी या शब्दावर भारत असेही स्टिकर लावले होते. (Kunal Raut in police custody for two days for blacking the posters of PM Narendra Modi)

हेही वाचा… Nashik Loksabha: नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा? ठाकरे-पवार आमनेसामने

- Advertisement -

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याने शनिवारी (ता. 03 फेब्रुवारी) सायंकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन ‘मोदी की गॅरंटी’ अशा आशयाच्या पोस्टर्सला काळे फासले. यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही सहकारी सुद्धा उपस्थित होते. यानंतर त्याने मोदी या शब्दावर भारत असे स्टिकर लावून पोस्टर्सवरील नाव खोडले. या घडलेल्या प्रकाराची माहिती नागपूर पोलिसांना मिळताच त्यांनी कुणाल राऊत याला नोटीस बजावत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, कुणाल राऊत हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत बेपत्ता झाला होता. यानंतर नागपूर शहरापासून 40 किमी लांब असलेल्या कुही या ठिकाणाहून नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्यासोबतच पोलिसांनी अखिल भारतीय युवा काँग्रेसचे सरचिटणीस अजित सिंग यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

कुणाल राऊतने मोदींच्या फोटोला काळे का फासले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतःची प्रसिद्धी करत असल्याचा आरोप प्रदेश युवक काँग्रेसने केला होता. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळेही फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

काय म्हणाला होता कुणाल राऊत?

भारत सरकारव्दारे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. मात्र यातून नागरिकांची दिशाभूल करत शासकीय आवारात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपली स्वतःची प्रसिद्धी करत असून केवळ स्वत:च्या प्रचार-प्रसारासाठी सर्वसामन्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे या निष्फळ गोष्टीवर जनतेचा पैसा खर्च करणाऱ्या या सरकारचा निषेध आंदोलन करण्यात येत असल्याचे मत युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याने व्यक्त केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -