घरदेश-विदेशWHO नागरिकांना घाबरवायचे काम करतेय - जितेंद्र आव्हाड

WHO नागरिकांना घाबरवायचे काम करतेय – जितेंद्र आव्हाड

Subscribe

सध्या देशासह जगभरात कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे.

“सुरूवातीपासूनच करोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना लोकांना धीर देण्याऐवजी उलटं घाबवरण्याचं काम करत आहे. सुरूवातीला कोरोना विषाणू जास्त धोकादायक नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि आता ते कोरोना बाबतीत सारखं आपलं विधान बदलत आहेत.” असं म्हणत आव्हाड यांनी WHO वर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत टीका केली आहे. मूलभूत नियमांचं पालन न केल्यास याचे परिणाम गंभीर ते अतिगंभीर होतील, असा इशारा WHO ने सर्व देशांना दिला होता.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -