सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी होणार ‘भाईजानची’ चौकशी?

bollywood actor sushant suicide salman khan urges fans to support sushant family
सुशांतच्या कुटुंबियांना साथ द्या, भाईजानने चाहत्यांना केले विनंती

सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आत्तापर्यंत ३० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी आता बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानची सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. एक महिना उलटून गेला तरी सुशांतच्या आत्माहत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुशांतने हे टोकाच पाऊल का उचललं याबाबत पोलीस वेगवेगळ्या बाजूने विचार केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. यामध्ये त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह अनेक त्याचे सहकलाकार, मित्र आणि नातेवाईकांचा समावेश आहे. आता अभिनेता सलमान खानची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

सलमान करणार होता सुशांतबरोबर काम

सुशांत सिंह प्रकरणात आता अभिनेता सलमान खान याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणात उद्या सलमान खान याला समन्स जारी केला जाऊ शकतो. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेता सलमान खान याची माजी व्यवस्थापक रेश्मा शेट्टी हिचा जबाब नोंदविण्यात आला होता. आता सलमान खान याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत सुशांत सिंह राजपूत याला घेऊन एक चित्रपटाची निर्मिती करणार होता. मात्र काही कारणाने सुशांत राजूपतच्या विवादानंतर सलमान खानने हा चित्रपट करणार नसल्याचे कळते.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यानुसार सुशांतने आत्महत्या केली होती, असा प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे. मात्र त्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणात पोलिसांना आणखी पैलू समजू शकतील. तसेच हे प्रकरण अपमृत्यूचे असल्याकारणाने या प्रकरणाची फाईल एकाएकी बंद करता येणार नाही. चौकशीचा अंतिम अहवाल गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांना दिला जाईल. त्यानंतर न्यायालयात अहवाल सादर केला जाईल, त्यानंतरच या प्रकरणावर निर्णय होईल.

तपासाच्या सुरुवातील पोलिसांनी सुशांतचे नातेवाईक, घरातील नोकर आणि मित्र-मैत्रिणींचा जबाब नोंदविला होता. त्यासोबतच बॉलिवूडमधील काही बडे दिग्दर्शक, अभिनेत्यांचे मॅनेजर, पीआर यांनाही चौकशीसाठी बोलाविले होते. आता ३५ लोकांना पुन्हा एकदा उलट तपासणीसाठी बोलविण्यात येणार आहे. जर आधीच्या आणि आता घेतलेल्या नव्या जबाबात तफावत आढळल्यास पोलिसांनी काही नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


हे ही वाचा – Sushant Suicide Case: पोलिसांचा उलट तपास सुरु; मोठ्या अभिनेत्याच्या PR ची होणार चौकशी