घरताज्या घडामोडीहल्ल्यामागे तालिबान्यांसह पाकिस्तानही, बायडन - घनी यांच्यातील १४ मिनिटांचे संभाषण उघडकीस

हल्ल्यामागे तालिबान्यांसह पाकिस्तानही, बायडन – घनी यांच्यातील १४ मिनिटांचे संभाषण उघडकीस

Subscribe

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्यात २३ जुलै रोजी शेवटची फोन कॉलवरून चर्चा झाली. घनी यांच्या नेतृत्त्वातील सत्ता १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबीज केली. त्याआधीच हा कॉल झाल्याची बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. दोन्ही राष्ट्राध्यक्षांमध्ये जवळपास १४ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये लष्कराची उपलब्धतता, राजकीय रणनिती यासारख्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे कळते. पण तालिबानी हावी होतानाच त्यांना रोखण्याबाबतची कोणतीही चर्चा दोघांमध्ये घडली नाही. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती या वृत्तसंस्थेला मिळाली आहे. रॉयटर्सला या संवादाची ट्रान्स्क्रिप्ट उपलब्ध झाली आहे. तालिबान्यांकडून एकापाठोपाठ एक असा अफगाणिस्तानातील शहराचा ताबा घेण्यामागे पाकिस्तासोबतच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचाही सहभाग होता असा दावा या फोन कॉलदरम्यान घनी यांनी केला आहे. (Joe Biden ashraf ghani 14 minutes telephonic call on 23rd july before taliban takeover of afganistan)

रॉयटर्सने हा संवाद एेकूनच दोघांमध्ये झालेल्या संवादाच्या माहिती खातरजमा केली आहे. बायडन यांनी घनी यांना सल्ला देतानाच लष्कराची सक्षम अशी रणनिती तयार करण्यासाठी यावेळी सांगितले. योद्ध्याच्या स्वरूपातील व्यक्तीची नेमणुक या लष्कराच्या रणनितीच्या पदावर करण्याची गरज असल्याचेही बायडेन यांनी सांगितले. त्याचवेळी अफगाणिस्तानातील संरक्षण मंत्र्यांबाबतही त्यांनी टिप्पणी केल्याचे कळते. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री जनरल बिसमिल्लाह खान मोहम्मदी हे संरक्षण रणनितीसाठी योग्य व्यक्ती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच लष्कराची रणनिती ठरवण्यासाठीच्या व्यक्तीची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. जागतिक पातळीवर अफगाणिस्तानची प्रतिमा सुधारण्याचीही गरज असल्याचे बायडन यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

अफगाणिस्तानातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही ठोस निर्णय घेतले तर ते मत बदलू शकते असेही बायडन यांनी त्यावेळी सांगितले. अफगाणिस्तानात तालिबान्यांकडून एकापाठोपाठ एक अशी शहरे काबीज होत असतानाच जगासमोर ही प्रतिमा बदलण्यासाठी नक्कीच अफगाणिस्तानातील नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानकडे उत्तम अशा स्वरूपाचे सैन्यदल आहे. तुमच्याकडे सद्यस्थितीला ३ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिक आहेत. तालिबान्यांच्या ८० हजारांच्या तुलनेत हे नक्कीच जास्त आहेत. त्यामुळे हे सैन्य लढण्यासाठी नक्कीच सक्षम असल्याचे बायडन यांनी सांगितले. बायडन यांनी एकप्रकारे अफगाणिस्तानातील सैन्याचे कौतुक करत लढण्यासाठी हे सैनिक पुरेसे असल्याचे एकप्रकारे प्रशस्तीपत्रकच अफगाणिस्तानातील सैन्याला दिले, असे या १४ मिनिटांच्या फोनकॉलमधून समोर आले आहे.

- Advertisement -

अमेरिका म्हणून आम्ही फक्त राजकीय किंवा आर्थिकदृष्टी तसेच डिप्लोमॅटिक पद्धतीने लढणार नसून तर तुमची सत्ता टिकेल आणि वाढेल अशा दृष्टीनेही मदत करणार असल्याचे आश्वासन बायडन यांनी घनी यांना दिले होते. या संवादाबाबत व्हाईट हाऊसने रॉयटर्सने मागितलेल्या प्रतिक्रियेवर बोलण्यास नकार दिला. अमेरिकेकडून अफगाणिस्तानातील लष्करावर युद्ध हरल्याचा ठपका ठेवला जात असतानाच हा संवाद समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतरही बायडन यांनी स्पष्टीकरण दिले होते. अफगाणिस्तान सरकार ही अपयशी ठरल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे. आम्ही लढायला तयार होतो, पण अफगाणिस्तानच्या सरकारनेच या सगळ्या प्रकणात अपयश स्विकारले.

एकटे तालिबानीच या हल्ल्यामध्ये सहभागी नसून त्यासोबतच आणखी शक्तींचाही हात असल्याची प्रतिक्रिया घनी यांनी दिली होती. तालिबानसोबतच मोठ्या प्रमाणात पाकिस्तान या हल्ल्यात उतरले आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर १५ हजार दहशतवाद्यांकडूनही या हल्ल्याला खतपाणी घालण्यात येत आहे अशी खंत घनी यांनी व्यक्त केली. त्यामुळे एकट्या तालिबान्यांचा हा हल्ला नसल्याचेही ते म्हणाले.

डॉ अब्दुल्लाह यांच्यासोबत माझे बोलणे झाले असल्याचेही घनी यांनी स्पष्ट केले होते. डॉ अब्दुल्लाह हे तालिबांन्यासोबत वाटाघाटीसाठी गेले होते, पण तालिबान्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असाही उल्लेख फोनकॉलमध्ये आहे. लष्करामध्ये समतोल राखला गेला तरच शांती शक्य असल्याचेही घनी म्हणाले. आम्ही अफगाणिस्तानातील चार मुख्य शहरांमध्ये सातत्याने दौरे करत आहोत. त्यामुळे अमेरिकेचे सहकार्य आम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल असेही घनी यावेळी म्हणाले.


हे ही वाचा – Afghanistan Crisis : इंदौर दंगलीचे तालिबान कनेक्शन


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -