घरदेश-विदेशयाही देशांमध्ये होतोय स्वातंत्र्य दिन साजरा

याही देशांमध्ये होतोय स्वातंत्र्य दिन साजरा

Subscribe

भारतासोबत आणखी तीन देशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे.

देशभरात आज, १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. इंग्रज भारताला स्वातंत्र्य १९४७ ला नाही तर १९४८ ला देणार होते. मात्र, महात्मा गांधी यांच्या ‘भारत छोडो’ या आंदोलनानंतर इंग्रजांनी १९४७ मध्येच भारताला स्वातंत्र्य दिले. दिडशे वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला आणि भारताने आपला पहिला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४७ ला साजरा केला. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतासोबत आणखी तीन देशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या देशांनाही १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले होते. कोरिया, बहरीन आणि कांगो असे त्या तीन देशांचे नाव आहे.

कोरिया

दक्षिण कोरिया हा देशही १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या देशाला १९४५ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. प्रायद्वीप जपानने १९१९ ते १९४५ या काळात कोरियावर राज्य केले. तेव्हा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे कोरियाचे विभाजन झाले नव्हते. १९४८ पर्यंत दोन्ही देश संयुक्त होते.

- Advertisement -

बहरीन

सौदी अरेबीयाशी किंग फहाद कॉजवे या पुलाशी जोडला गेलेला बहरीन देश हा १५ ऑगस्ट १९७१ मध्ये स्वातंत्र्य झाला. हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. हा छोटासा देश ब्रिटनच्या गुलामगीरीत होता. कुवेत आणि इराक यांच्या युद्धानंतर १९९० मध्ये बहरीन देशला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यपद मिळाले.

कांगो

फ्रान्सच्या गुलागीरीतून कांगो हा देश १५ ऑगस्ट १९६० मध्ये स्वातंत्र्य झाला. कांगो हा देश तब्बल ८० वर्षे फ्रान्सच्या गुलागिरीत होता. क्षेत्रफळानुसार कांगो हा देश जगातील सर्वात मोठा अकरावा देश मानला जातो.

- Advertisement -

हेही वाचा –

Sacred games 2 : जुना खेळ, नवे गडी!

स्वातंत्र्यदिनी ही गाणी नक्की ऐका!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -