घरदेश-विदेशकोट्यवधींचा अत्तर व्यावसायिक पीयूष जैनला अटक, छापेमारीत २५७ कोटींची रोकड आणि दागिने...

कोट्यवधींचा अत्तर व्यावसायिक पीयूष जैनला अटक, छापेमारीत २५७ कोटींची रोकड आणि दागिने जप्त

Subscribe

उत्तरप्रदेशात कर चुकवेगिरीच्या आरोपाखाली कनौरमधील अत्तर व्यापारी पीयूष जैनला कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे. पीयूष जैनला पुढील कारवाईसाठी कानपूरहून अहमदाबादला नेले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या छापेमारीत पीयूष जैनकडून २५७ कोटींची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. अब्जावधी रुपयांचा जीएसटी भरला नसल्याचा आरोप पीयूष जैनवर करण्यात आला आहे.

जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पीयूष जैनवर CGST कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. एजन्सींच्या कारवाईदरम्यान, व्यापारी जैन याच्या घरात तळघर सापडले असून त्याच्या फ्लॅटमध्ये ३०० चाव्या सापडल्या आहेत. जप्त केलेल्या संपत्तीबाबत अद्याप पीयूष जैन आणि त्याच्या मुलाने समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही.

- Advertisement -

कानपूरमधील बहुतेक पान मसाला उत्पादक पीयूष जैन यांच्याकडून पान मसाला कंपाऊंड खरेदी करतात. दरम्यान, रविवारी कन्नौज येथील व्यावसायिकाच्या वडिलोपार्जित घरावरही छापे टाकण्यात आले.

डीजीजीआय, आयकर विभागाची कारवाई

गुरुवारी, GST गुप्तचर महासंचालनालय म्हणजेच DGGI आणि प्राप्तिकर विभागाने कन्नौजचे अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या कानपूर येथील घरावर छापा टाकला. या दरम्यान त्याच्या घरातील कपाटात इतके पैसे सापडले की नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले. एकूण आठ मशीनद्वारे पैसे मोजण्यात आले.

- Advertisement -

एजन्सी जैन यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या?

अहमदाबादच्या डीजीजीआय टीमने एक ट्रक पकडला होता. या ट्रकमध्ये जाणाऱ्या मालाचे बिल बनावट कंपन्यांच्या नावाने बनवण्यात आले होते. सर्व बिले ५० हजार रुपयांपेक्षा कमी होती, त्यामुळे Eway बिल करावे लागणार नाही. यानंतर डीजीजीआयने कानपूरमधील ट्रान्सपोर्टरच्या जागेवर छापा टाकला. येथे डीजीजीआयला सुमारे २०० बनावट बिले मिळाली. येथूनच डीजीजीआयला पीयूष जैन आणि बनावट बिलांचे काही कनेक्शन कळले.

यानंतर डीजीजीआयने उद्योगपती पीयूष जैन यांच्या घरावर छापा टाकला. अधिकारी जैन यांच्या घरी पोहोचताच कपाटात नोटांचे बंडले पडलेले दिसले. त्यानंतर आयकर विभागाला माहिती देण्यात आली. तेव्हापासून या एजन्सींच्या अत्तर व्यवसायावर कारवाई सुरू आहे.


Omicron Variant : देशात ओमिक्रॉनबाधितांचा आकडा ५०० पार, १९ राज्यांत आढळले इतके रुग्ण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -