घरदेश-विदेशथायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांच्या मदतीला किर्लोस्कर ब्रदर्स

थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांच्या मदतीला किर्लोस्कर ब्रदर्स

Subscribe

थायलंडमधे अडकलेल्या १३ जणांपैकी आठ जणांना वाचवण्यात थायलंड नौदलाच्या कमांडोंना यश आले आहे. मात्र उरलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्याची मागणी केली आहे. केबीएलनेही लागलीच प्रतिसाद देत ही मदत देऊ केली आहे.

थायलंडमधे एका दुर्गम असणार्‍या सात किमी लांबीच्या गुहेत अडकलेल्या १३ जणांपैकी नऊ जणांना काढण्यात थायलंड नौदलाच्या कमांडोंना यश आले आहे. मात्र अजूनही पाच जण अडकले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसेच या मुलांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला अडथळे येऊ लागले असल्याने या मुलांना सोडवण्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्याची मागणी केली होती. या मागणी नंतर केंद्र सरकारने आणि केबीएलने तातडीने हालचाल करून फ्लडपंप्स प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली आहेत. या मुलांना बाहेर काढण्यासाठी इलॉन यांनी एक पाणबुडी तयार केली असून ही पाणबुडी घेऊन ते थायलंडला पोहोचले आहेत.

kirloskar brothersनेमके काय घडले?

थायलंडच्या ‘लुआँ नांग नोन’ या गुहेमध्ये फुटबॉल कोच एकापोल चॉंटावोंग आपल्या १२ विद्यार्थ्यांसह एका प्रॅक्टिस मॅचनंतर कुतुहलापोटी गेले होते. मात्र मुसळधार पावसाने गुहेतील पाण्याचा स्तर वाढला आणि सगळे जण गुहेतच अडकले. अखेर थायलंडच्या नौदल पथकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर १३ जणांचा शोध लागला. त्यांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी रविवारपासून बचाव मोहीम सुरु आहे. या गुहेतून बाहेर काढण्यात येणाऱ्या मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून ते गुहेत राहिल्यामुळे त्यांना कोणत्या रोगाची लागण झाली नाही ना, याची डॉक्टर तपासणी करत आहेत. तसेच त्यांना एखाद्या रोगाची लागण झाली असल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरता त्यांना आई वडिलांपासून दूर ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -