घरक्राइमसामूहिक बलात्काराचा व्हिडीओ पोहोचला SPपर्यंत; तरुणीने सांगितली निर्दयी प्रियकराच्या अत्याचाराची कहाणी

सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ पोहोचला SPपर्यंत; तरुणीने सांगितली निर्दयी प्रियकराच्या अत्याचाराची कहाणी

Subscribe

गोपलगंज येथील कुचायकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणीला तिच्याच गावातील तीन तरुणांनी आणि शेजारच्या गावातील दोन तरुणांनी गावातीलच एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच, सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला.

बिहारमधील गोपालगंज येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाने मित्रांना बोलावून आपल्याच प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ जेव्हा एसपींपर्यंत पोहोचला तेव्हा एकच खळबळ उडाली.

गोपलगंज येथील कुचायकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणीला तिच्याच गावातील तीन तरुणांनी आणि शेजारच्या गावातील दोन तरुणांनी गावातीलच एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच, सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला. मंगळवारी हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर तरुणीच्या जबाबावरून पोलीसांनी पाच तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे तसेच, या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कुचायकोट पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी एक शाळकरी मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली. काही दिवस उलटल्यानंतर तरुणीला तिच्या प्रियकराने फोन करून बोलावले आणि एका खोलीत नेऊन आपल्या इतर मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान तीन तरुणांनी केलेल्या बलात्काराचा व्हिडिओ अन्य दोन तरुणांनी बनवला होता.

( हेही वाचा: शिंदेंची शिवसेना आता ‘गोव्या’त; आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारी )

- Advertisement -

सामूहिक बलात्काराची घटना घडून सुमारे दोन महिने उलटले तरी व्हिडिओ बनवणारे तरुण या पीडित तरुणीला फोन करुन पुन्हा शरीर सुखाची मागणी करत होते, तसेच, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ​होते, मात्र तरुणीने नकार दिला. यानंतर तरुणांनी सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित केला.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु 

हा व्हिडिओ एसपींपर्यंत पोहोचला आणि एकच खळबळ उडाली. व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, एसपी स्वर्ण प्रभात यांच्या सूचनेनुसार, कुचायकोट पोलिस स्टेशनचे प्रमुख किरण शंकर यांनी पीडित मुलीशी संपर्क साधला आणि तिला पोलिस ठाण्यात बोलावले आणि तिचा जबाब नोंदवून घेतला. सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

( हे्ही वाचा: निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मुस्लिमांचे जीवन कठीण असतं तर…’, ओवैसींनी दिलं उत्तर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -