Lakhimpur violence : शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याप्रकरणी केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल, ९ जणांचा मृत्यू

उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यासाठी शेतकरी जमले होते.

Lakhimpur violence up police filed complaint against union minister ajay mshira tenis son ahsish mishra
Lakhimpur violence : शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याप्रकरणी केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल, ९ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गाडी चढवल्या प्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर सपा राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्यांवर गाडी चढवल्यामुळे उत्तरप्रदेशमधील लाखीमपुरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. संतप्त शेतकऱ्यांना दोन गाड्यांची जाळपोळ केली आहे.

उत्तर प्रदेशमधील लाखीमपुर खीरी खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मिक्ष यांचा मुलगा आशिष मिश्राने काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असल्यामुळे ९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यासाठी शेतकरी जमले होते. या शेतकऱ्यांवर आशिष मिश्राने गाडी घातली.

आशिष मिश्राने शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अशिषवर गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यानुसार पोलिसांनी अजय मिश्राविरोधात हत्या, मृत्यूसाठी जबाबदार, अपघात अशा अनेक कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

काय आहे घटना ?

लाखीमपुर खीरीतील तिकोनियामध्ये रविवारी सकाळी ८ वाजता शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु झाले. आंदोनकारी शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचे हेलिकॉप्टर उतरणाऱ्या ठिकाणी ठाण मांडले. यानंतर दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांचा ताफा तिकोनिया भागातून जात असताना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आशिष मिश्राने शेतकऱ्यांवर गाडी चढवली यामध्ये ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. संतप्त शेतकऱ्यांनी आशिषच्या गाडीसह आणखी एक गाडी पेटवून दिली. या हिंसाचारात ३ शेतकऱ्यांचा मृत्यू आणि ८ शेतकरी जखमी झाले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी फेटाळला आरोप

केंद्रीय मंत्री अजय मीश्र टेनी यांनी आपला मुलगा दोषी नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे की, हिंसाचारात माझ्या मुलाचा समावेश नव्हता. हिंसाचार झाला तेव्हा आशिष एका नियोजित दंगलच्या कार्यक्रमात सहभागी होता. तिकडे फोटो आणि व्हिडिओही काढण्यात आले असल्याचा दावा अजय मिश्र टेनी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात; मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होत्या