घरताज्या घडामोडीLassa fever: नवं संकट! उंदारांमुळे पसरतोय लासा ताप, जाणून घ्या लक्षणे

Lassa fever: नवं संकट! उंदारांमुळे पसरतोय लासा ताप, जाणून घ्या लक्षणे

Subscribe

लासा ताप किंवा लास व्हायरस कसा मानवात पसरला? आणि यांची नेमकी लक्षणे काय आहेत? जाणून घ्या

देशात आणि जगात आता कोरोना नियंत्रणात येताना दिसत आहे. लोकांचे जीवन पुन्हा एकदा रुळावर येत आहे. पण यादरम्यान नवं संकट घोंघावत आहे. ब्रिटनमधून हे संकट येत आहे. ब्रिटनमध्ये लासा तापाचे (Lassa fever किंवा Lassa Virus) तीन केसेस समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. चिंताजनक म्हणजे ११ फेब्रुवारीला या केसेसमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान लासा तापाच्या या केसेस पश्चिम आफ्रिकन देशांच्या प्रवासाशी संबंधित आहेत. नायजेरियामध्ये लासा नावाच्या एका ठिकाणी या व्हायरसची पहिली केस आढळली होती. यामुळे याला लासा ताप असे नाव देण्यात आले आहे. या लासा ताप किंवा लासा व्हायरसबाबत जाणून घ्या.

आतापर्यंतच्या माहितीनुसार, लासा तापासंबंधित मृत्यूदर खूप कमी म्हणजे जवळपास १ टक्के आहे. पण काही रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याचे आढळले आहे. महत्त्वाचे म्हणजे गर्भवती महिलांमध्ये या धोका अधिक आहे. युरोपियन सेंटर फॉर डिजीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलनुसार, जवळपास ८० टक्के केसेस लक्षणे नसलेली म्हणजे एसिम्पटमॅटिक आहेत आणि त्यामुळे या आजाराचे निदान होणे आणि उपचार करणे कठीण होत आहे. काही रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडण्याची शक्यता आहे, कारण उपचार न मिळाल्यावर त्यांच्यामध्ये गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. रुग्णालयातील भरती रुग्णांपैकी १५ टक्के मृत्यू होऊ शकतात.

- Advertisement -

उंदरातून कसा पसरला लासा ताप?

लासा ताप निर्माण करणारा व्हायरस पश्चिम आफ्रिकेत आढळला आहे. पहिल्यांदा १९६९ मध्ये लासाचा रुग्ण नायजेरियामध्ये आढळला होता. नायजेरियामध्ये दोन नर्सच्या मृत्यूनंतर या आजाराबाबत कळाले होते. लासा संसर्ग उंदरामुळे पसरतो. प्रामुख्याने सिएरा लिओन, लायबेरिया, गिनी आणि नायजेरियासह पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळतात. संक्रमित उंदराच्या मुत्र आणि विष्ठेपासून दूषित अन्न आणि घरगुती वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार मानवात पसरला. त्यानंतर बाधित माणसापासून तो माणसात पसरला. जर संक्रमित रुग्णांच्या डोळे, नाक किंवा तोंडातून निघणाऱ्या द्रव्यपदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर हे संसर्ग माणसांमध्ये पसरू शकतो. तसेच मिठी मारणे, हात मिळवणी करणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या जवळ बसणे हे रोग पसरवण्याचे कारण असू शकते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लासा तापाचे लक्षणे

लासा तापाचे लक्षणे साधारणतः एक ते तीन आठवड्यानंतर दिसतात. सौम्य लक्षणांमध्ये सौम्य ताप, थकवा, कमकुवतपणा, डोके दुखी होते. तर गंभीर लक्षणांमध्ये रक्तस्राव, श्वास घेण्यास कठीणता, उल्टी, चेहऱ्याला सूज येणे, छाती, पाठ आणि पोटात दुखणे ही लक्षणे दिसतात.

- Advertisement -

हेही वाचा – Donkey : गाढवाचे मटण अन् दूधही गुणकारी, तरीही महाराष्ट्रासह देशाभरात गाढवांच्या संख्येत मोठी घट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -