घरAssembly Battle 2022Guru Ravidas Jayanti 2022: पंतप्रधान मोदींची रविदास विश्रामधाम मंदिराला भेट, मंजिरा वाजवत...

Guru Ravidas Jayanti 2022: पंतप्रधान मोदींची रविदास विश्रामधाम मंदिराला भेट, मंजिरा वाजवत कीर्तनात दंग

Subscribe

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीतील करोलबाग येथील गुरू रविदास विश्राम धाम मंदिराला भेट दिली आहे. तसेच त्यांनी महिलांसोबत किर्तनात सहभाग देखील घेतला आहे. मोदींनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते किर्तनात दंग झाले. तसेच त्यांनी महिलांसोबत भजन करत मंजिरा देखील वाजवला आहे.

- Advertisement -

संत रविदास यांचा जन्म १६ व्या शतकात उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला होता. ते समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील चुकीच्या गोष्टींना विरोध केला होता. तसेच अस्पृश्यतेसारख्या सामाजिक प्रथेविरुद्ध आवाज उठवला. लोकांनी आपले कर्म कधीही सोडू नये. तसेच नेहमी लोकहिताचे काम करावे, असे संत रविदास यांचे विचार होते. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’, असा संदेश देखील त्यांनी देशाला दिला.

- Advertisement -

पंजाबची विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, ही निवडणूक १४ फेब्रवारी ऐवजी २० फेब्रुवारीला होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. कारण १६ फेब्रुवारी रोजी श्री गुरू रविदास यांची जयंती असल्यामुळे पंजाबी लोकं वाराणसीला जातात. याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलल्याची मागणी पंजाबमधील अनेक नेत्यांनी केली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी निवडणूक आयोगाला या संबंधीत पत्र लिहिले होते. या पत्रात मुख्यमंत्री चन्नी यांनी निवडणुकीची तारीख ६ दिवसांनी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तसेच भाजपनेही रविवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याच्या मागणीवर निवडणूक आयोगाने काँग्रेस, भाजप आणि पंजाब लोक काँग्रेसची बैठक घेतली होती. बैठकीत निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि इतर पक्षांची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी मान्य केली. त्यानंतरच निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक येत्या २० फेब्रुवारीला होणार आहे.


हेही वाचा : Punjab assembly election 2022 : अरविंद केजरीवाल दहशतवाद्यांच्या घरी सापडू शकतात, राहुल गांधींचा गौप्यस्फोट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -