घरAssembly Battle 2022Punjab assembly election 2022 : अरविंद केजरीवाल दहशतवाद्यांच्या घरी सापडू शकतात, राहुल...

Punjab assembly election 2022 : अरविंद केजरीवाल दहशतवाद्यांच्या घरी सापडू शकतात, राहुल गांधींचा गौप्यस्फोट

Subscribe

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मतदानाचा दुसरा टप्पा देखील पार झाला आहे. आता मतदानाचा तिसरा टिप्पा येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार अूसन याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बरनाला येथील एका सभेत जनतेला संबोधित करताना आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचं नाव न घेता गौप्यस्फोट केला आहे.

आम आदमी पार्टीचे बडे नेतेही दहशतवादांच्या घरी सापडू शकतात. असं म्हणत राहुल गांधींनी आप प्रमुखांवर दहशतवाद्यांबद्दल मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप केलाय. तसेच ते राष्ट्रीय सुरक्षेबाबत अविश्वसनीय वाटत आहेत, असं देखील म्हणाले.

- Advertisement -

काहीही झालं तरी काँग्रेसचा एकही नेता दहशतवाद्यांच्या घरी सापडणार नाही. परंतु आम आदमी पार्टीचा नेता दहशतवाद्याच्या घरी सापडू शकतो. हीच सत्यता आहे, असा टोला राहुल गांधीनी बरनाला सभेतून लगावला आहे.

- Advertisement -

२०१७ च्या निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांनी पंजाबमधील मोगा येथे एका माजी खालिस्तानी दहशतवाद्याच्या घरी रात्रभर मुक्काम केला होता. पंजाब हे सीमावर्ती आणि संवेदनशील राज्य आहे आणि फक्त काँग्रेस पक्षच पंजाबला समजू शकतो आणि राज्यात शांतता प्रस्थापित करू शकतो. आप सरकार दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकबद्दल सतत भाष्य करत असते. परंतु काँग्रेस पक्ष आणि शीला दीक्षित यांनी दिल्लीत पहिले मोहल्ला क्लिनिक उघडले होते, असं राहुल गांधी म्हणाले.

कोरोना दरम्यान काय झाले,याचे उत्तर केजरीवाल यांनी द्यावे? कुठे गायब झाली आम आदमी पार्टी? दिल्लीच्या रूग्णांमध्ये नक्की काय झालं आणि ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था कोणी केली, अशा प्रकारचे अनेक प्रश्न राहुल गांधींनी आपच्या बड्या नेत्यांना विचारला आहे.


हेही वाचा : जो पाप करतो तोच घाबरतो, आमची चौकशी बिनधास्तपणे करा ; भातखळकरांचं राऊतांना खुलं आव्हान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -