घरताज्या घडामोडीLive Update : महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन ; नाना पटोलेंची...

Live Update : महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन ; नाना पटोलेंची माहिती

Subscribe

महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन ; नाना पटोलेंची माहिती


यवतमाळमध्ये शिलोना -फोपाळी घाटात एसटीला आग, पुसद वरून नांदेड जात होती बस. एसटी मध्ये ३५ प्रवासी करत होते प्रवास, पुसद आगाराच्या बसला आग, कोणतीही जिवीती हानी नाही

- Advertisement -

आघाडी सरकारच्या विरोधात मोर्चा

गडचिरोली देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात भाजप शेतकऱ्यांच्या समर्थनात आघाडी सरकारच्या विरोधात मोर्चा, भाजपच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. यात शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्यात यावा ही मुख्य मागणी असणार.


काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन

३१ तारखेपासून महागाई विरोधात आंदोलन – नाना पटोले

- Advertisement -

भाजपचा खरा चेहरा आम्ही जनतेला दाखवणार

शहरापासून ते गावापर्यंत काँग्रेसचे आंदोलन


देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. रविवारी पुन्हा एकदा इंधनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये तब्बल पाचवेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे ५० पैशांची तर डिझेलच्या दरात ५५ पैशांची वाढ करण्यात आली आहे.


भाजपसह सर्वपक्षीय खासदारांनी घेतली शरद पवारांची भेट

भाजपसह सर्वपक्षीय खासदारांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट

विविध पक्षातील १२ खासदारांचा समावेश

१२ खासदारांमध्ये भाजपच्या पाच खासदारांचा समावेश

खासदारांकडून बारामतीमधील विकास कामांची पहाणी


मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं रविवार २७ मार्च रोजी १२ तासांचा ब्लॉक मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी ०९:०० ते रात्री ०९:०० वा. यावेळेत हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. दिवा स्थानकावर स्विच पॉइंट, क्रॉस ओव्हर पॉइंट टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळं प्रवाशांना लोकलच्या लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे-कल्याण या स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेनं हा ब्लॉक असून, अप आणि डाउन जलद मार्गावर ही ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळं लोकलच्या फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्य़आत आला आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी ७.५५ ते संध्याकाळी ७.५० या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद उपनगरीय लोकल मुलुंड-ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

याशिवाय, कल्याण येथून सकाळी ८.३६ ते सायंकाळी ७.५० या वेळेत सुटणाऱ्या अप जलद उपनगरीय सेवा कल्याण आणि ठाणे/मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळापत्रकानुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर मार्गावर मात्र रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत लोकल विलंबाने धावणार आहेत. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -