घरताज्या घडामोडीLive Update: २१ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले उद्योजक गौतम पाषाणकर अखेर सापडले

Live Update: २१ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले उद्योजक गौतम पाषाणकर अखेर सापडले

Subscribe

२१ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले उद्योजक गौतम पाषाणकर जयपुरच्या हॉटेलमध्ये सापडले आहेत.


भाजपचे माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांच्या आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंनंतर जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रावादीत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

पीएम फंडातून २०० कोटींची मदत राज्यांना दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या लाईव्ह दरम्यान सांगितले.


दिवाळीनंतर कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे या कोरोना काळात एकजुटीने लढूया – नरेंद्र मोदी

- Advertisement -

पूर्वेश सरनाईक यांच्या घरातून ईडी अधिकारी बाहेर पडले आहेत. जवळपास २ तासांनंतर ईडी पूर्वेश यांच्या घरातून ई़डी बाहेर पडली आहे.


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले असून ते चौकशीसाठी रवाना झाले आहेत.


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. तसेच प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्याही घरी ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सविस्तर वाचा 


देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ९७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९१ लाख ७७ हजार ८४१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३४ हजार २१८ जणांचा मृत्यू झाला असून ८६ लाख ४ हजार ९५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान भेट देणार असल्याचे समोर येत आहे.


जगात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आणि मृत्याचा आकडा वाढत आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ कोटी ९५ लाख ९ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १४ लाख १ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ कोटी ११ लाख ५२ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


सोमवारी राज्यामध्ये ४,१५३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,८४,३६१ झाली आहे. राज्यात ८१,९०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४६,६५३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -