घरमुंबईसत्तेत येण्याची संधी न मिळाल्यानेच, राज्यात ED चा गैरवापर - शरद पवार

सत्तेत येण्याची संधी न मिळाल्यानेच, राज्यात ED चा गैरवापर – शरद पवार

Subscribe

भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थतता

सत्ता गेल्याची अस्वस्थतता ही महाराष्ट्र भाजपमध्ये दिसून येत आहे. महाराष्ट्रात सत्ता येण्याची एकही संधी भाजपला मिळत नाही अशी सध्या स्थिती आहे. म्हणूनच अधिकाराचा गैरवापर करून अशा प्रकारचा प्रयत्न होत आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपला लगावला. बीडचे माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

माणसाने आशा ठेवावी, मागेही त्यांनी सांगितल होत की मी पुन्हा येईन, आता कालही सांगितल अस एकायला मिळाले. भाजप सत्तेत येण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, पण अशावेळी आपण खबरदारी घेतलेली बरी असेही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्राची सत्ता हातात येण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, हे आजच्या ईडीच्या कारवाईतून दिसून येत आहे. हा पुर्णपणे अधिकाराचा गैरवापर आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ आहे. त्याचाच त्रास भाजपला होत असल्याचा चिमटाही त्यांनी यावेळी भाजपला काढला.

- Advertisement -

कोरोनाची लस लवकर, स्वस्त मिळावी

कोरोनाच्या बाबतीत राजकारण होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कोविडसारख संकट मानवी समाजावर येत तेव्हा क्षुद्र राजकारण करण योग्य नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. कोविडबाबतच्या लशीची काय प्रगती आहे याचा आढावा मी घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या संस्थेची उपयुक्तता आणि त्यांचे सुरू असलेले काम याबाबत समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. देशात, देशाबाहेर कोरोनाच्या संकटातून काढण्यासाठी ही लस उपयुक्त ठरणार आहे. ही लस लवकरात लवकर मिळावी आणि रास्त किंमतीत मिळावी अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -