घरमहाराष्ट्र'मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचे भुयारी गटार थेट कलानगरपर्यंत'

‘मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचे भुयारी गटार थेट कलानगरपर्यंत’

Subscribe

शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज कारवाई करत सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. या कारवाईनंतर भाजपमधून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे सरनाईक यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे. मुंबईतील रवींद्र वायकर आणि ठाण्यातील प्रताप सरनाईक यांजे भुयारी गटार कलानगरकडे जाते, असे सांगत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या कलानगरला या प्रकरणाशी जोडत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष वेधले आहे.

ईडीच्या पथकाने सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. टॉप्स सिक्युरीटी या कंपनीशी निगडीत आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ईडीला प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. टॉप्स ग्रुप्सचे प्रमोटर आणि सरनाईक यांचे संबंध असल्याची शक्यता असल्यामुळे ईडीने सरनाईक यांची चौकशी सुरु केली आहे. आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, ईडी, सीबीआय या देशातील जबाबदार संस्था आहेत. त्यामुळे त्या चुकीचे काही करतील, असे वाटत नाही. जर गैरप्रकार झाला असेल तर कारवाई झालीच पाहीजे, असेही राणे यांनी सांगितले.

- Advertisement -

सरनाईक आणि वायकर यांच्या भुयारी गटाराची चौकशी केली तर ईडी कलानगरपर्यंत पोहोचेल, असा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. तसेच सरनाईक हा फक्त समोरचा चेहरा असून मुख्य कलाकार हे कलानगरमध्ये बसले आहेत, अशी खळबळजनक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.

सरनाईक साधूसंत नाहीत – नारायण राणे

नितेश राणे यांच्याप्रमाणेच नारायण राणे यांनी देखील सरनाईक यांच्यावर टीका केली आहे. कायदेशीर गोष्टींची चौकशी पुर्ण होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते, पण सरनाईक हे काही साधूसंत नाहीत, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -