घरCORONA UPDATELive Update: धारावीत आज दिवसभरात आढळले १३ नवे रुग्ण!

Live Update: धारावीत आज दिवसभरात आढळले १३ नवे रुग्ण!

Subscribe

धारावीत आज दिवसभरात १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार १६५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यत २ हजार ६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या धारावीत १८८ रुग्ण Active आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातू माहिती दिली आहे.

- Advertisement -

मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ७१३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख २ हजार ४८८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ८८० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


जेष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी आणि गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून निवड झाली आहे.


मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

 


कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्तांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मास्क नसल्यास बेस्ट, बससह टॅक्सी, रिक्षात प्रवेश मिळण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारवाईसाठी वाहनांसह विविध ठिकाणी आदेश फलक लावणार आहेत.


कंगना प्रकरणावरील पुढील सुनावणी सोमवारी ५ ऑक्टोबरला होणार आहे. कंगना विरोधी पालिका वादातील आजची सुनावणी संपली आहे. सर्व प्रतिवाद्यांना युक्तीवादाचे कागद जमा करण्याचे कोर्टाचे निर्देश दिले आहेत.


देशात रुग्ण बरे होण्याची संख्या ५१ लाख पार झाली आहे. जगात सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण भारतात असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

 


ऑगस्टमध्ये १०० मिलियन डोस देण्याच्या घोषणेनंतर हा विस्तार करण्यात आला असून आतापर्यंत एकूण भागीदारीद्वारे कोरोना लसीच्या २०० मिलियन डोसपर्यंत भागीदारी देण्यात येणार आहे, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) सांगितले आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) २०२१ मध्ये भारत आणि निम्न व मध्यम उत्पन्न देशांकरिता अतिरिक्त १०० मिलियन कोरोना लसीचे लस डोस तयार केले. ही घोषणा एसआयआय, गावी, लस अलायन्स आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यात सहकार्याने पुढे आली: एसआयआ


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबईतील कलिना फॉरेंसिग सायन्स लॅबोरेटरीचा अहवाल आला असून सुशांतला कोणत्याही प्रकारचे विष दिल्याचे किंवा त्याला विषबाधा होऊन मृत्यूचे झाल्याचे आढळून आलेले नाही.


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण झाली आहे. उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.


उत्तर प्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार झालेल्या त्या १९ वर्षीय युवतीचा दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती तिच्या भावाने दिली आहे. याबाबत एएनआयचे ट्विट समोर आले आहे.


देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६१ लाखांच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासांत ७० हजार ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ७७६ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1310788598690508800


जम्मू काश्मिरमध्ये एलओसीच्या सीमेवर पाकिस्तानच्या वतीने गोळीबार करण्यात आला आहे. येथील मानकोट सेक्टर, पूंछ जिल्ह्यात हा गोळीबार झाला असल्याची माहिती जम्मूतील सुरक्षा दलाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. तर भारतानेही या गोळीबाराचे चोख उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.


भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज दुपारी १ वाजता वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात महापौरांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत. तर सायंकाळी ५ वाजता ते राज्याच्या राज्यपालांची भेट घेतील.


गुजरातमधील बडोदे येथे काम सुरू असलेली तीन मजली इमारत मध्यरात्री कोसळल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे. (सविस्तर वृत्त)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -