घरदेश-विदेशLok Sabha 2024 : काँग्रेसशी चर्चा सुरू असतानाच पश्चिम बंगालमध्ये डाव्यांकडून 16...

Lok Sabha 2024 : काँग्रेसशी चर्चा सुरू असतानाच पश्चिम बंगालमध्ये डाव्यांकडून 16 उमेदवार जाहीर

Subscribe

कोलकाता : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रत्येक प्रमुख पक्षांनी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षापाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांनीही गुरुवारी लोकसभेसाठी 16 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेससमवेत जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच माकपाने ही घोषणा केली आहे.

हेही वाचा – Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक रोख्यांची माहिती वेळेआधीच सार्वजनिक 

- Advertisement -

डाव्या पक्षाने कोलकाता दक्षिण, हुगळी, बिष्णुपूर आणि आसनसोलसारख्या काही प्रमुख जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. डाव्या आघाडीने कोलकाता दक्षिणमधून माकपाच्या सायरा शाह हलीम, डम डममधून सृजन चक्रवर्ती, जादवपूर येथून सृजन भट्टाचार्य, सेरामपूरमधून दीप्सिता धर आणि तमलूक येथून सायन बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

आम्ही फक्त 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. 16 उमेदवारांपैकी 14 उमेदवार नवीन आणि तरुण असल्याचे डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस यांनी सांगितले. प्रदेश काँग्रेसचे नेते सध्या त्यांच्या हायकमांडशी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत गेले आहेत. त्यामुळे ते परत आल्यावर चर्चा करू. बघूया काय होते ते, असेही ते म्हणाले. काँग्रेससाठी किती काळ वाट पाहणार असे विचारले असता ते म्हणाले की, डाव्या आघाडीचे घटक पक्ष असलेल्या माकपा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपी यांच्यात शनिवारी पुन्हा चर्चा केली जाईल.

हेही वाचा – Jitendra Awhad : काका का, हे आता त्यांच्या चांगलंच लक्षात आलं असेल; जितेंद्र आव्हाडांचा पवारांना टोला

सन 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. 2021च्या विधानसभा निवडणुकीतही डाव्या आघाडीच्या पदरी निराशाच आली. आता विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियामधील तृणमूल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सर्व 42 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर भाजपाने 20 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

हेही वाचा – Shiv Sena VS BJP : भाजपाच्या उमेदवारीमुळे शिवसेनेला माढ्यात फटका; संपर्कप्रमुखाचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -