घरदेश-विदेशLok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातच मतदानाचा टक्का घसरला; आयोगाचे नव्याने...

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातच मतदानाचा टक्का घसरला; आयोगाचे नव्याने आवाहन

Subscribe

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्याचे मतदान देखील झाले आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सगळ्याच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. निवडणूक आयोग देखील कमी मतदानामुळे चिंतेत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्याचे मतदान देखील झाले आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सगळ्याच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. निवडणूक आयोग देखील कमी मतदानामुळे चिंतेत आहे. (Lok Sabha Election 2024 election commission concerned over low voter turnout in first phase poll)

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पहिल्या टप्प्यातच मतदानात चार टक्क्यांची घट झाली आहे. एकूणच निवडणुकीबद्दल मतदारांमध्ये निरुत्साह असून मतदान वाढवण्यासाठी उर्वरित सहा टप्प्यांत अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी निवडणूक आयोग देखील प्रयत्नशील आहे. दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली होती. मात्र, तरीही पहिल्या टप्प्यात मतदानात घटच झाल्याचे आकडे सांगत आहेत.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात 19 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 102 मतदारसंघांत मतदान झाले. या मतदारसंघांमध्ये 16 कोटींहून जास्त मतदार आहेत, तरी मतदानासाठी 65.50 टक्के मतदारच घराबाहेर पडले. 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात यापेक्षा जास्त मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर टर्नआऊट’ अ‍ॅपमध्ये शनिवारीच मतदानांची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात 102 मतदारसंघांपैकी केवळ 10 मतदारसंघांमध्येच जास्त मतदान झाले.

यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुका देखील एप्रिल आणि मे महिन्यात झाल्या होत्या, तरीही तेव्हा जास्त मतदान झाले. 2014 किंवा 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये सात टप्प्यात निवडणुका झाल्या. आणि या दोन्ही निवडणुकीत पहिल्या टप्प्यातच जास्त मतदान झाले. यंदा मात्र पहिल्या टप्प्यात अपेक्षित मतदान न झाल्याने निवडणूक आयोगासमोर उर्वरित सहा टप्प्यांचे आव्हान आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष देखील कमी मतदानामुळे चिंतेत आहेत. (Lok Sabha Election 2024 election commission concerned over low voter turnout in first phase poll)

- Advertisement -

मतदान कमी होण्याची कारणे?

वाढत्या उन्हाचा सध्या सर्वांनाच त्रास होतो आहे. हवामान विभागाकडून सातत्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जात आहे. याचाच परिणाम मतदानावर झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच एप्रिल, मे हे दोन महिने प्रामुख्याने लग्नसराईचे असतात. त्यामुळे देखील मतदानावर परिणाम होतो. याशिवाय मे महिना हा उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी असतो. शाळांच्या सुट्ट्यांमुळे याच काळात लांबच्या ट्रिप आखल्या जातात. आणि त्याचे बुकिंग देखील बरेच आधी होते. निवडणुकीच्या तारखा तोवर जाहीर झाल्या नसल्याने अनेकजण त्या काळात बाहेरगावी असतात. त्याचाही फटका अनेकदा निवडणुकांना बसतो. या सगळ्यांसोबतच एक महत्त्वाचं कारण यंदा समोर येतंय ते म्हणजे, मतदारांमध्ये दिसणारा निरुत्साह. एकूणच राजकीय परिस्थतीबद्दल मतदार काही फारसा समाधानी नाही. त्याचेही प्रतिबिंब कमी मतदान होण्यात उमटल्याचे मानले जात आहे.

निवडणूक आयुक्तांचे आवाहन व्यर्थ?

निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोग काय काय प्रयत्न करत असतो, याची माहिती दिली होती. एकेका मतासाठी आयोगातील कर्मचारी बरीच मेहनत घेत असतात. हे सांगत असतानाच राजीव कुमार यांनी शहरी भागातील मतदान केंद्रे त्या तुलनेत अत्यंत जवळ असल्याचे सांगतानाच आवर्जून मतदान करावे, असे आवाहन केले होते. मात्र, पहिल्या टप्प्यातील आकडेवारी पाहता, त्याचा फार काही उपयोग झालेला दिसत नाही. यामुळे पुढील सहा टप्प्यांसाठी आयोगाला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. (Lok Sabha Election 2024 election commission concerned over low voter turnout in first phase poll)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -