घरदेश-विदेशLok Sabha election 2024 : विरोधी पक्षनेत्यांची 23 जूनला पाटण्यात महाबैठक, जेदयूचा...

Lok Sabha election 2024 : विरोधी पक्षनेत्यांची 23 जूनला पाटण्यात महाबैठक, जेदयूचा पुढाकार

Subscribe

नवी दिल्ली : बिहारची राजधानी पाटणा येथे 23 जून रोजी विरोधी पक्षांची महाबैठक (important meeting) होणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha election 2024) रणनीती आखण्यासाठी ही बैठक होत असून त्याला देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही बैठक आधी 19 मे आणि नंतर 12 जून रोजी होणार होती, मात्र सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. मात्र आता 23 जून रोजीच्या बैठकीसाठी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सहमती दर्शविली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे (SP) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) प्रमुख आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena UBT) अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे (DMK) अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) सचिव डी राजा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (CPM) सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी – मार्क्सवादी आणि लेनिनवादीचे (CPI – ML) सचिव दीपंकर भट्टाचार्य यांनीही बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले असल्याचे जनता दल युनायटेडचे (JDU) राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांनी सांगितले.

लोकसभेची निवडणूक विरोधक एकत्रितपणे लढवणार!
पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक विरोधक एकत्रितपणे लढवतील. देशात आज अघोषित आणीबाणी लागू आहे. कोणी काहीही बोलू शकत नाही. कोणी तोंडातून ‘ब्र’ जरी काढला तर त्याच्यावर लगचे कारवाई केली जाते. त्यामुळेच आज विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. देशाला भाजपमुक्त करण्याची आवश्यकता आहे. यात विरोधी एकजूट महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास लल्लन सिंह यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पाटण्यात होणारी बैठक देशासाठी महत्त्वाची – तेजस्वी यादव
नितीश कुमार यांच्यासह मी स्वतः अनेक नेत्यांना भेटलो आहे. सर्वजण एकाच व्यासपीठावर येत आहेत, असे मला वाटते. लोकशाहीवर हल्ला होत आहे, अशी देशातील परिस्थिती आहे. राज्यघटनेत बदल केले जात आहेत. काही ठोस गोष्ट होत नाही. हुकूमशाही वृत्ती अवलंबली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाटण्यात महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर सकारात्मक दृश्य पाहायला मिळेल, असे मला वाटत असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले. विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधायची, हा नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि इतर सर्व नेत्यांचा प्रयत्न होता. यासाठी सर्वांनाच मेहनत करावी लागेल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -