घरदेश-विदेशमुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर

मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर

Subscribe

मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी आता संघाच्या शाखा सरकारी कार्यालयातही भरतील, असे म्हटलं आहे

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवरुन भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. सत्तेत आल्यावर सरकारी ठिकाणी शाखांवर बंदी घालू, असं वचन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं आहे. यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देताना आता संघाच्या शाखा सरकारी कार्यालयातही भरतील, असे म्हटल आहे. मध्य प्रदेशात सत्तांतर झाल्यास सरकारी जागांवर भरणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालू, असं आश्वासन काँग्रेसकडून जनतेला देण्यात आलं आहे. यावरुन शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील आणि सरकारी कर्मचारीदेखील शाखांमध्ये सहभागी होतील. यावर कोणीही बंदी आणू शकत नाही, असं सिंग यांनी म्हटलं आहे.

वाचा : राम मंदिरासाठी आरएसएसची ९ डिसेंबरला मेगा रॅली

- Advertisement -

संघ ही देशभक्तांची संघटना

खरगोन जिल्ह्यातील एका प्रचारसभेत शिवराज सिंग यांनी सोमवार, १२ नोव्हेंबर रोजी भाषण केले. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल आणि त्यातील शाखांवरील बंदीच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सरकारी कार्यालयांमध्येही शाखा भरतील, असं उत्तर त्यांनी दिलं. ‘फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर प्रत्येक देशभक्त शाखेत जाऊ शकतो. कारण संघ ही देशभक्तांची संघटना आहे,’ असं सिंग यांनी यावेळी म्हटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -