घरदेश-विदेश८ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार

८ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार

Subscribe

८ वर्षाच्या मुलावर नाभिकानंच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उत्तरप्रदेशमध्ये समोर आला आहे.

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये देखील एका ८ वर्षाच्या मुलाचं नाभिकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा ज्यावेळी नाभिकाच्या दुकानामध्ये केस कापण्यासाठी गेला. त्यावेळी हा सारा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या साऱ्या प्रकारबद्दल पीडित मुलानं त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर कुटुंबियांना थेट पोलिस ठाण्यात धाव घेत नाभिकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

वाचा – ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या?

लहान मुलांवरचे अत्याचार, लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासाठी कायदे देखील कडक केले जात आहेत. आता असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेशमध्ये देखील समोर आला आहे. सोमवारी देखील गुरूग्राममध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -