घरदेश-विदेश'तुमची मुलगी बेशुद्ध पडलीय' बलात्कार करणाऱ्या आरोपींचा वडिलांना फोन

‘तुमची मुलगी बेशुद्ध पडलीय’ बलात्कार करणाऱ्या आरोपींचा वडिलांना फोन

Subscribe

मध्य प्रदेशच्या गुनामध्ये 15 वर्षीयी मुलीचे अपहरण करत तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील धक्कादायक प्रकार म्हणजे अज्ञात आरोपींनी बलात्कारानंतर मुलीच्या वडिलांना फोन करत तुमची मुलगी एका खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली. या घटनेनंतर गावातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आजी माजी आमदारांनी आरोपींवर कारवाईसाठी रस्ता जाम केला. यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत विविध गुन्ह्यांखाली पाच आरोपींना अटक केली आहे. पीडितेने सात आरोपींची नाव घेतली होती, मात्र पोलिसांनी पाचचं आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपींपैकी चार जण अल्पवयीन आहेत. आरोपींच्या फोननंतर पीडितेच्या वडिलांसह काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी पीडिता एका गल्लीतील सुनसान घराच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडून होती. यावेळी संपप्त नागरिकांनी 3.30 तास रस्ता जाम आंदोलन करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. पीडितेने सामुहिक बलात्काराची तक्रार केली आहे. पोलीस मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत.

- Advertisement -

पीडितेच्या वडीलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझी मुलगी सकाळी 10 वाजता शाळेत गेली होती. यावेळी सायंकाळपर्यंत ती घर न आल्याने आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध सुरु केला. यानंतर अचानक एका व्यकीचा फोन आला की, तुमची मुलगी बिनागंज येथील एका वस्तीतील खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडून आहे. मी तिथे पोहचताच आरोपी पळून गेले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेला बलात्काराच्या घटनेपूर्वी ड्रग्ज देण्यात आले होते. यामुळे ती खूप वेळ ती बेशुद्ध अवस्थेत होती. याचा गैरफायदा घेत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेच्या निषेधार्थ अनेक महिला, मुलींनी स्थानिक एसडीए कार्यालय गाठत आरोपींची मालमत्ता पाडून तिथे सार्वजनिक परेड करण्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.


Top 10 Billionaires : जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये गौतम अदानी तिसरे, अंबानी ‘या’ स्थानावर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -