घरदेश-विदेशMH370 चा शोध थांबवण्याचे मलेशियन वाहतूक मंत्र्यांचे आदेश

MH370 चा शोध थांबवण्याचे मलेशियन वाहतूक मंत्र्यांचे आदेश

Subscribe

 

खाजगी अमेरिकन कंपनीद्वारे घेण्यात येणारा बेपत्ता मलेशियन एअरलाईन्सच्या MH370 विमानाचा शोध पुढच्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत थांबवण्याचे आदेश मलेशियाच्या नव्या वाहतूक मंत्र्यांनी दिले आहेत. ८ मार्च २०१४ रोजी बीजिंगवरून क्वालालंपूर येथे जाणारं हे विमान अचानक बेपत्ता झालं होतं. या विमानाचा शोध गेली चार वर्ष सुरू आहे. २३९ लोकांना घेऊन जाणाऱ्या या विमानाचं नक्की काय झालं हे अजूनही एक न उलगडलेलं रहस्यच आहे.

- Advertisement -

कॅबिनेटमध्ये मलेशियन पंतप्रधानांनी दिला निर्णय

गुरुवारी कॅबिनेटमध्ये २९ मे पर्यंतच हा शोध घेतला जाणार असल्याचं मलेशियाचे वाहतूक मंत्री अॅन्थनी लोक यांनी पत्रकारांना सांगितलं. तर नव्याने निवडून आलेले मलेशियाचे पंतप्रधान महातीर महंमद यांनी सरकारची पहिली कॅबिनेट बैठक घेतल्यानंतर शोधाबाबत अधिक तपशील घेऊन याची आवश्यकता आहे का? हे जाणून घेतलं. आवश्यकता नाही हे लक्षात आल्यानंतर या कराराचे कंपनीबरोबर नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

नातेवाईकांनी शोध घेत राहण्याची केली होती विनंती

दरम्यान, MH370 विमानाच्या नातेवाईकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘व्हॉईस ३७०’ या ग्रुपने नव्या सरकारला शोधमोहिमेबद्दल पुनरावलोकन करण्याची अथवा त्याबद्दल सर्व खरीखोटी शहानिशा करण्याची विनंती केली होती.
शोधकर्त्यांनी विमान आणि जहाजांच्या साहाय्याने व्यापक शोध घेऊनही या बोइंग एअरलाइनरचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. या विमानाचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया व मलेशिया यांनी ६० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात संयुक्तरीत्या सुरू केलेल्या मोहीमेसाठी १२० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -