घरदेश-विदेशमेकुनू वादळाचा ओमान आणि येमेनला तडाखा

मेकुनू वादळाचा ओमान आणि येमेनला तडाखा

Subscribe

उष्णकटिबंधीय क्षेत्रात मेकुनू चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. या वादळामुळे ओमान आणि येमेन येथील किनारपट्टी भागात जमीन धसून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मेकुनू वादळ ७५ किमी प्रति तास वेगाने अरब द्वीपकल्पाच्या दिशेने सरकत आहे. येत्या २४ तासांत हे वादळ द्वीपकल्पाच्या काही भागात पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अरबी समुद्रात झाली निर्मिती
या वादळाची निर्मिती अरबी समुद्रात झाली असून मागील आठवड्यात या वादळामुळे ओमान आणि येमेनच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. येथील नागरिकांमध्ये या वादळामुळे भितीचे वातावरण आहे.

- Advertisement -

सागर चक्रीवादळानंतर मेकुनू वादळ
या वादळापूर्वी ‘गल्फ ऑफ एडन’जवळ निर्माण झालेल्या ‘सागर’ या चक्रीवादळामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या वादळामुळेच मेकुनू वादळाची निर्मिती झाल्याचे सांगितले जात आहे. ओमान येथील वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास या वादळाला सुरुवात झाली. संयुक्त टायफून सतर्कता केंद्राने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ हळूहळू अधिक प्रभावी बनत चालले आहे.

भारतीय किनारपट्टी सुरक्षित –
काही महिन्यांपूर्वी आलेला ओखी वादळामुळे भारतीय किनारपट्टीलगत भितीचे वातावरण होते. या वादळात मोठ्या जीवित आणि वित्तहानी झाली होती. मेकुनू वादळाची निर्मिती अरबी समुद्रातच झाली असली तरीही ते अरबी द्वीपकल्पाकडे वळत आहे. त्यामुळे या वादळाचा भारतीय किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचे हवामान खात्याने सांगितले.
मेकुनू वादळाबाबत जाणून घ्या या गोष्टी
१. मेकुनू हे मालदीवियन नाव आहे. मालदीवच्या उत्तरकिनारी भागात आणि लक्षद्वीपच्या पश्चिम भागात याची निर्मिती
२. या वादळामुळे शनिवारी २६ मे रोजी दक्षिण ओमान आणि दक्षिण पूर्व येमेन येथील किनारपट्टी भागातील काही जमीन धसण्याची शक्यता
३. पूर्व येमेन ते ओमानमधील अश्शुअमियाह येथील परिसरांना मेकुनू चक्रवर्ती वादळाचा मोठा झटका बसणार
४. या वादळामुळे (Island Socotra) सोकोट्रा द्वीपच्या उत्तर आणि पूर्व भागात ६५-८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडणार
५. हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार २३ ते २६ तारखे दरम्यान वाऱ्याचा वेग वाढणार असून त्यामुळे देशातील अनेक भाग प्रभावित होण्याची शक्यता
६. अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यावर बंदी घातली आहे. २३ ते २६ तारखेदरम्यान समुद्रान न जाण्याचा इशारा सरकारने दिला
७. भारतात बंगळुरुमध्ये मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून नियमित पाऊस पडत आहे. तसेच केरळ किनारपट्टीवर देखील हवेच्या दिशांचे अंदाज घेतले जात आहेत.
८. वादळी वारे भारतापासून दूर असल्यामुळे लक्षद्वीप आणि भारतीय पश्चिम किनारपट्टीलगत धोक्याचे वातावरण नसल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -