घरदेश-विदेशतिला पाठवायचा अश्लील मेसेज; तिनं केलं असं काही, की आपसूक जाळ्यात अडकला!

तिला पाठवायचा अश्लील मेसेज; तिनं केलं असं काही, की आपसूक जाळ्यात अडकला!

Subscribe

महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अनेक भामट्यांना पकडण्यात पोलीस यशस्वी ठरत असले, तरी आजही अशी अनेक प्रकरणं आहेत, ज्यात अशा विकृतांना पकडणं कठीण होऊन बसतं. अशा प्रकरणांमध्ये वेगवेगळे सीमकार्ड वापरल्यामुळे त्यांचा माग काढणं कठीण होतं. तसेच, या प्रकरच्या गुन्ह्यांमध्ये महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, चेन्नईमध्ये घडलेल्या अशाच एका गुन्ह्यामध्ये संबंधित पीडित महिलेने असा काही फास टाकला की त्यामध्ये एक विकृत अगदी अलगद अडकला आणि त्याची कुटुंबीयांनी यथेच्छ धुलाई देखील केली. चेन्नईच्या अरुंबक्कम भागामध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणात पोलिसांनी विमलराज नावाच्या २९ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे. विमलराज एका ई-कॉमर्स कंपनीचा डिलीव्हरी एजंट म्हणून काम करतो.

फोनवर केला अश्लील भाषेत संवाद

सदर महिला तिच्या पतीसोबत वाद झाल्यामुळे आपल्या पालकांसोबत अरुंबक्कममध्ये राहाते. गेल्या काही दिवसांपासून एक विकृत व्यक्ती तिला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. त्यामुळे महिलेला मनस्ताप सहन करावा लागत होता. ४ ऑगस्टला या विकृताने महिलेला फोन केला. बोलताना तो अश्लील भाषेत बोलू लागला. त्यामुळे महिलेने फोन कट केला. पण त्यानंतर देखील तो वेगवेगळ्या फोनवरून महिलेला फोन करून त्रास देऊ लागला. ८ ऑगस्ट रोजी तर त्याने पीडित महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ देखील पाठवले. त्यावर महिलेने अखेर तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या कानावर घडलेला प्रकार घातला.

- Advertisement -

या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांची मदत घेण्याआधी या विकृताला चांगलीच अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार पीडित महिलेने या विकृताला मोबाईलवर प्रतिसाद देत त्याला भेटण्यासाठी तिच्या घरी येण्याचा आग्रह केला. त्यानंही तो मान्य केला. ठरल्या वेळी तो घरात येताच घरातच दबा धरून बसलेल्या कुटुंबीयांनी त्याला पकडलं आणि त्याची यथेच्छ धुलाई केली. धुलाई झाल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणात महिलेच्या पतीचा देखील काही हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -