घरदेश-विदेशपत्नीच्या क्रेडिट कार्डने भरला प्रेयसीचा ट्रॅफिक फाइन, पत्नीने केले असं काही...

पत्नीच्या क्रेडिट कार्डने भरला प्रेयसीचा ट्रॅफिक फाइन, पत्नीने केले असं काही…

Subscribe

प्रेयसीलाही बसला धक्का

सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपवता येत नाही. पत्नीपासूनही कोणतीही गोष्ट लपवली तरी पत्नी काही ना काही करुन ती माहिती करतेच. असाच काहीसा प्रकार दुबईमध्ये घडला आहे. पतीने आपल्या प्रेयसीची ट्रॅफिक फाईन पत्नीच्या क्रेडिट कार्डने भरले. आपल्या खात्यातून अनोळखी व्यक्तीने आपली ट्रॅफिक फईन भरली असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तपासात असे समजले की, महिलेच्या पतीने आपल्या प्रेयसीची ट्रॅफिक फाईन पत्नीच्या क्रेडिट कार्डने दिली आहे. महिलेला वाटले की, तिच्या अकाऊंटमधील पैसे चोरी झाले आहेत.

महिलेला बँकेकडून मॅसेज मिळाला की तिच्या क्रेडिट कार्डवरुन ट्रांजेक्शन झाले आहे. महिलेने बँकेत फोन करुन या बाबत माहिती घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच आपले क्रेडिट कार्डही ब्लॉक करुन टाकले. आपल्या अकाउंटमधून पैसे चोरले असल्याचे महिलेला वाटत होते. परंतु पत्नीला जेव्हा सत्य कळाले तेव्हा तिला अश्चर्याचा धक्काच बसला.

- Advertisement -

प्रेयसीलाही बसला धक्का

गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तपासात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या महिलेची चौकशी केल्यावर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. कारण महिलेला माहिती नव्हते की, तिच्या पतीने आपल्या प्रेयसीची फाईन भरली आहे. तसेच प्रेयसीलाही माहित नव्हते की आपल्या प्रियकराचे लग्न झालेले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -