घरक्राइमभयंकर! वृद्धाला मारहाण करून फेकले दरीत; मात्र घडले काही असे...

भयंकर! वृद्धाला मारहाण करून फेकले दरीत; मात्र घडले काही असे…

Subscribe

कल्याण येथे राहत असणारे रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले प्रकाश लक्ष्मण भोईर यांनी घर दुरुस्तीचे काम न दिल्याच्या रागातून तिघा मित्रांनी त्यांचे अपहरण केले.

कल्याण येथे राहत असणारे रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले प्रकाश लक्ष्मण भोईर यांनी घर दुरुस्तीचे काम न दिल्याच्या रागातून तिघा मित्रांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना मुरबाड माळशेज घाटात नेऊन त्यांच्या डोक्यात दगड मारून दरीत ढकलून दिल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. मात्र भोईर जखमी अवस्थेतून दरीच्या बाहेर पडले. या आरोपींना महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार झाला आहे. लक्ष्मण भोईर हे खडकपाडा कल्याण येथे वास्तव्यास असून त्यांच्या घराच्या डागडुगीचे काम शैलेश दत्तात्रय गायकवाड (३५), भरत मच्छिंद्र गायकवाड आणि प्रदीप वसंत जाधव यांना न दिल्याने हे आरोपी प्रचंड संतापले होते. सेवानिवृत्त असणारे भोईर यांचे सेवानिवृत्तीचे पैसे हडप करण्याच्या उद्देशाने स्टेट बँक कल्याण येथे आरोपींनी त्यांना बोलावून घेत त्यांना रिक्षात बसवले. अपहरण करीत माळशेज घाटावर उंच व निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना जबर मारहाण करण्यात आली. मोबाईल फोन जबरदस्तीने घेऊन भोईर यांच्या डोक्‍यात दगड घालून त्यांचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांना दरीत फेकून देण्यात आले.

सेवानिवृत्त असलेले भोईर हे मृत्यू पावले असतीन या भ्रमात आरोपी होते त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या बनावट चावीने घरात शिरून ७५००० रोख रक्कम, तेरा लाख पंचवीस हजार किमतीचे सव्वीस तोळे सोने, एक्टिवा व अन्य वस्तू असे मिळून चौदा लाख पंच्यानव हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ज्येष्ठ नागरिक असलेले भोईर यांना रात्री सातच्या दरम्यान माळशेज घाटातील दरीत फेकले नंतर तब्बल तीन तासांनी ते कसेबसे दरीबाहेर आले. रस्त्यावर येऊन एक ट्रॅक्टरला हात दाखवत मदत मागितली. मग त्यांनी टोकावडे पोलिस स्टेशन गाठून त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर प्राथमिक उपचार करीत त्यांना अधिक उपचारांसाठी कल्याणमधील रेल्वे हॉस्पिटल येथे दाखल केले. महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा मागोवा घेत गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच आरोपींचा शोध घेत तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली. २५ जानेवारी रोजी दुपारी अपहरण केल्यानंतर २४ तासात गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश संपादन केले आहे.

- Advertisement -

गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या टीमने तांत्रिक कौशल्याचा वापर करून २४ तासात गुन्हा उघडकीस आणला. पोलीस आयुक्त फणसळकर, अप्पर पोलिस आयुक्त कराळे, कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सीनियर इन्स्पेक्टर नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर संभाजी जाधव हे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा –

भाजप-मनसे युतीचे संकेत, राज ठाकरे करणार घोषणा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -