घरदेश-विदेशमनोहर पर्रिकर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होणार

मनोहर पर्रिकर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होणार

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती पुन्हा खालवल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान विशेष विमानाद्वारे ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार पर्रिकरांवर दिल्लीमध्ये उपचार होणार आहे. विशेष विमानाने मनोहर पर्रिकर दिल्लीला रवाना झाले आहेत. पंतप्रधानांनी विशेष विमानाची सोय केली आहे. गोव्यामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप केंद्रीय निरिक्षक बी. एल. संतोष गोव्याकडे रवाना झाले आहे.

पर्रिकरांवर दिल्लीत होणार उपचार 

मनोहर पर्रिकर गेल्या ७ महिन्यांपासून स्वादूपिंडाच्या आजारामुळे त्रस्त आहेत. याआधी त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात २ वेळा त्यानंतर अमेरीकेत ३ वेळा उपचार झाले आहेत. प्रकृती खालावल्यामुळे मनोहर पर्रीकर यांना १३ सप्टेंबरला सकाळी कलंगुट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणखी तब्बेत खालावत असल्याने त्यांच्यावर आता दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार होणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग

अमेरिकेहून परतल्यानंतर गेले आठ दिवस पर्रीकरांनी मंत्रालयाला भेट दिलेली नाही. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य, घटकपक्षाचे नेते तसंच भाजपाच्या कोअर कमिटीलाही भेटण्याचं त्यांनी टाळलं आहे. भाजपाच्या कोअर कमिटीतही पर्रिकरांच्या आजारामुळे कमालीची अस्वस्थता आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून तातडीने नेतृत्वबदल करण्याची मागणी केली आहे. घटकपक्षांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांचा समावेश आहे. या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नेतृत्वबदल अटळ आहे आणि पक्षश्रेष्ठींचा दूत काय संदेश घेऊन येतोय, याकडे त्यांचंही लक्ष लागले आहे. विधानसभेत काँग्रेस मोठा पक्ष असल्याने त्यांनीही राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा केली व्यक्त

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री पद दुसऱ्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पर्रिकरांची प्रकृती खालवल्यामुळे ते पुन्हा अमेरिकेला जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयातच उपचार होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी मनोहर पर्रिकर यांच्याशी चर्चा केली. भाजप देखील पर्रिकरांच्या जागी तात्पुरत्या पर्यायाच्या शोधात आहेत. भाजपने विजय पुराणिक यांना पर्यवेक्षक म्हणून गोव्याला पाठवले आहे. त्याचबरोबर भाजप केंद्रीय निरिक्षक बी. एल. संतोष गोव्याला जाणार आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -