घरदेश-विदेशप्रशासनाचे दुर्लक्ष, शहीद जवानाची आई करतेय स्मारकाची देखभाल

प्रशासनाचे दुर्लक्ष, शहीद जवानाची आई करतेय स्मारकाची देखभाल

Subscribe

कठुआ येथील शहिद जवानाच्या स्मारकाकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानाचा सरकारला विसर पडला असून जवानाच्या स्मारकाची देखभाल त्याची वृद्ध आई करत आहे.

भारतीय जवानांना शासनाने नेहमीच उपेक्षित ठेवले आहे. तसेच शहीद जवान आणि त्यांचे कुटुंबियदेखील उपेक्षितच राहिले आहेत. असाच एक संतापजनक प्रकार जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे घडला आहे. किर्ती चक्र विजेते भारतीय जवान कॅप्टन सुनीलकुमार चौधरी हे २००८ साली एका मिशनवर असताना शहीद झाले. घटनेच्या वर्षभरानंतर प्रशासनाने सुनीलकुमार यांचे कठुआ येथे स्मारक उभारले. परंतु स्मारक उभारल्यानंतर प्रशासनाने या स्मारकाकडे साफ दूर्लक्ष केले आहे. या स्मारकाची स्वच्छता करण्यासाठीदेखील प्रशासनाकडे वेळ नाही. २७ जून रोजी सुनीलकुमार यांची पुण्यतिथी आहे. अद्याप प्रशानाने स्मारकाची साफ सफाई केलेली नाही. मुलाची पुण्यातिथी जवळ आलेली असल्यामुळे आपल्या मुलाचे स्मारक स्वच्छ करण्याचे काम सुनीलकुमार यांच्या आईने हाती घेतले आहे. हे पाहुन प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीवर स्थानिक संतापले आहेत. स्थानिकांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. तसेच स्थानिंकानी सुनीलकुमार यांच्या आईचे स्मारकाची साफसफाई करतानाचे फोटोदेखील ट्विटरवर शेअर केले आहेत.

Captain sunil Kumar's monument
कॅप्टन सुनील कुमार यांचे स्मारक

सुनील कुमार हे ७/११ गोरखा रेजिमेंटचे जवान होते. २४ व्या वर्षी ते भारतीय सैन्यात भरती झाले. जम्मू काश्मीरमध्ये ते व त्यांचे सहकारी २७ जून २०१८ रोजी मिशनवर असताना दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. त्यामध्ये त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुनीलकुमार यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. तरिही ते दहशतवाद्यांशी लढत राहीले. जखमी अवस्थेत ते लढत राहिले, अशा परिस्थितीत त्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यानंतर ते धारातीर्थी पडले. सुनीलकुमार यांनी रणांगणात गाजवलेल्या शौर्याबद्धल त्यांना मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात आले. मिशनवर जाण्याच्या एक दिवस अगोदर सुनीलकुमार यांना शासनाने सेना पदकाने गौरवण्यात आले.

- Advertisement -

महाराष्ट्राशी कनेक्शन

सुनीलकुमार हे जम्मू काश्मीरचे असले तरी, त्यांनी पूणे येथील गरवारे महाविद्यालयातून अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी पुण्याच्याच सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. जवळपास ६ ते ७ वर्ष ते पुण्यात वास्तव्यास होते.

ट्विटरवर लोकांनी केला संताप व्यक्त

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -