घरदेश-विदेशअमेरिकेच्या वृत्तपत्र कार्यालयात गोळीबार; ५ ठार

अमेरिकेच्या वृत्तपत्र कार्यालयात गोळीबार; ५ ठार

Subscribe

अमेरिका मेरिलँडमधील एनापोलिस येथील कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एकाला अटक केली.

अमेरिका मेरिलँडमधील एनापोलिस येथील एका इमारतीच्या कार्यालयात गोळीबार झाला. इमारतीत असलेल्या कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून संपूर्ण इमारत ताब्यात घेतले आहे. वॉशिंग्टन पश्चिमेला असलेल्या एनापोलिस शहरातील येथील गोळीबाराची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आली आहे. कॅपिटल गॅझेटचे पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्विटरवरून या घटनेची माहिती दिली.


“एका व्यक्तीने कार्यालयाच्या दरवाज्यातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी गोळी लागून अनेक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला. जेव्हा तुम्ही डेस्कच्या खाली असता आणि तुम्हाला लोकांवर गोळीबार होत असल्याचे आणि बंदुकधारी व्यक्ती गोळ्या रिलोड करतानाचा आवाज ऐकू येत असतो, तेव्हा यापेक्षा भयानक काहीही असू शकत नाही,” असे फिल डेव्हिसन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ट्विट

विस्कॉन्सिनला जाण्याआधी मला एनापोलिस, मेरीलँडच्या कॅपिटल गॅझेट येथे गोळीबार झाल्याचे सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत तसेच जखमींसोबत माझ्या प्रार्थना कायम आहेत. सध्या तेथे उपस्थित राहिलेल्या सर्वप्रथम प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद देतो.
– डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

- Advertisement -


कॅपिटल गॅझेटचे कार्यालय एनापोलिसच्या चार मजली इमारतीत आहे. एनापोलिस अमेरिकेतील मेरिलँड राज्याची राजधानी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत माहिती देण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे, अशी माहिती अमेरिकेच्या सीबीएस न्यूजने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -