घरदेश-विदेशपद्मश्री पुरस्कार विजेते हरेकल हाजब्ब फळ विकून त्यांनी बांधली गावात शाळा!

पद्मश्री पुरस्कार विजेते हरेकल हाजब्ब फळ विकून त्यांनी बांधली गावात शाळा!

Subscribe

कर्नाटक, मंगळुरू येथील एका ६८ वर्षीय फळविक्रेत्याला सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. हरेकल हाजब्ब या फळ विक्रेत्याने दिवसाला १५० रुपये कमावत असतानाही आपल्या गावात प्राथमिक शाळा बांधली. त्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

हरेकल हाजब्ब हे फळ विक्रेते आहेत. मंगळुरू येथे ते फळ विक्री करतात. मंगळुरूपासून जवळ असलेल्या न्यूपाडपु या गावात ते राहतात. एक दिवशी मंगळुरू येथे फळ विकत असताना एका परदेशी पर्यटकांनी त्यांना एका संत्र्याची किमत इंग्रजीत विचारली. मात्र, तो परदेशी पर्यटक काय बोलतोय हे हरेकल यांना समजले नाही. त्यामुळे त्यांना स्वत:ची लाज वाटली. त्यांना स्वत:ला कोणतेही शालेय शिक्षण मिळाले नव्हते. मात्र, त्याचवेळी त्यांनी प्रतिज्ञा केली की मी माझ्या गावात शाळा बांधिन, असे स्वत: हरेकल सांगतात.

- Advertisement -

हरेकल हाजब्ब यांचे गाव न्यूपाडपुमध्ये अनेक वर्षांपासून शाळा नव्हती. त्यामुळे त्यांच्या गावातील अनेक मुलांना शालेय शिक्षण मिळत नव्हते. त्याची खंत हरेकल यांना होती. शेवटी २००० साली त्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी गुंतवणूक करून एक एकर जागेवर प्राथमिक शाळा बांधली.

मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही; पण माझ्या गावातील मुलांना शिक्षणाची संधी हुकू नये ही माझी आंतरिक इच्छा होती, असे हरेकल यांनी सांगितले. आज माझ्या गावातील शाळेत १७५ विद्यार्थी आहेत. दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हरेकल हाजब्ब यांना २००० साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. मात्र, कोरोनामुळे पद्म पुरस्कार वितरण समारंभ होऊ शकला नाही. सोमवारी मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हाजब्ब यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हाजब्ब जेव्हा पुरस्कार घेण्यासाठी गेले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्यांचे टाळ्यांनी स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -