घरदेश-विदेशमेहबुबा मुफ्तींचा भाजपवर हल्लाबोल; पाठिंबा काढल्याने आक्रमक

मेहबुबा मुफ्तींचा भाजपवर हल्लाबोल; पाठिंबा काढल्याने आक्रमक

Subscribe

भाजपने पाठिंबा काढल्यानंतर पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात सलोखा राखण्यास आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी दिली.

जम्मू – काश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर पीडीपीच्या नेत्या आणि जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपची दांडगाई काहीही उपयोगाची नसून राज्यात सलोखा नांदावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा आरोप करत भाजपने मंगळवारी दुपारी सरकारचा पाठिंबा काढल्याने पीडीपी सरकार पडले.

काय म्हणाल्या मुफ्ती?

भाजपने पाठिंबा काढल्यामुळे मला कोणताही धक्का बसलेला नाही. कारण आम्ही सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर जम्मू – काश्मीरच्या नागरिकांसाठी सत्तेत होतो. राज्यात कोणत्याही पक्षांची दांडगाई चालणार नसून सलोखा राखण्यास आम्ही कायम प्राधान्य दिल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पत्रकाराशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी आर्टिकल ३७०च्या मुद्यावर देखील आपले मत व्यक्त केले. राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात काहीच गैर नसून आम्ही विशेष राज्याच्या अधिकारामुळे आनंदी असल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे सर्व आरोप मुफ्ती यांनी फेटाळून लावले. यावेळी बोलताना त्यांनी दगडफेक करणाऱ्या ११००० जणांविरोधातील गुन्हे मागे घेतल्याची देखील माहिती दिली. भाजपने पाठिंबा काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर बोलताना आम्ही राज्यात संवादाच्या माध्यमातून शांतता आणि सलोखा राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

‘सत्तेसाठी कुणाशीही युती नाही’

दरम्यान, पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी आपण कुणाचाही पाठिंबा घेणार नसल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. सत्ता स्थापनेसाठी पीडीपी नॅशनल कॉन्फरन्सची साथ घेणार का? यावर मेहबुबा मुफ्ती यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

भाजपचा ‘पीडीपी’वर आरोप

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, वाढता दहशतवाद, पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या आणि मुख्यमंत्री म्हणून मुफ्ती यांना अपयश आल्याचा आरोप करत भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला. मंगळवारी दुपारी भाजपने तशी घोषणा करत पाठिंबा काढत असल्याचे पत्र राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याकडे पाठवले. त्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी देखील आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -