घरदेश-विदेश१० बँकांचे विलीनीकरण

१० बँकांचे विलीनीकरण

Subscribe

राष्ट्रीयकृत बँकांची संख्या २७ वरून १२

देशभरात छोट्या – छोट्या अनेक बँका अस्तित्वात आहेत, त्या सर्वांवर केंद्रीय पातळीवरून नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे. त्यामुळे या बँकांमध्ये नीरव मोदी यांच्यासारखी कर्ज घोटाळ्यांची प्रकरणे घडली. त्याचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकींग क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. म्हणून देशातील छोट्या बँकांचे विलीनीकरण करून मोजक्याच मोठ्या बँका अस्तित्वात असाव्यात, जेणेकरून त्यांच्या विलीनीकरणानंतर त्यांच्याकडील भांडवल क्षमताही वाढेल, तसेच बँकांची मोठी आव्हाने स्वीकारण्याची क्षमता वाढेल, अशा बहुउद्देशासाठी शुक्रवारी देशातील १० राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण करण्याची महत्त्वाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. या निर्णयामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांची संख्या 27 वरून 12 पर्यंत आली आहे.

विलीनीकरण करण्यात येणार्‍या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक, कॅनरा बँक, सिंडीकेट बँक यांचा समावेश आहे. 2017 मध्ये देशात 27 सार्वजनिक क्षेत्रातील बँक होत्या. सध्या देशात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रामधील 18 बँकांपैकी 14 बँका नफ्यामध्ये आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वेळी म्हणाल्या. या निर्णयानुसार युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनकरण करण्यात येईल. या विलीनीकरणानंतर पंजाब नॅशनल बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनणार आहे. सरकारी क्षेत्रामधील कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचे विलीनीकरण करण्यात येईल. तसेच युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे युनियक बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील पाचवी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. तसेच अलाहाबाद बँकेमध्ये इंडियन बँकेचे विलीनीकरण होईल. त्यानंतर ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील सातवी सर्वात मोठी बँक बनेल,अशी माहिती सीतारामन यांनी दिली. दरम्यान या बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचार्‍यांचा त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागणार नाही, सर्वांच्या नोकर्‍या सुरक्षित राहतील, असे अर्थमंत्र्यांनी आश्वासित केले.

- Advertisement -

विलीनीकरण होणार्‍या बँका
१. पंजाब नॅशनल बँक – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया.
(१७.९४ लाख कोटींचे भाग भांडवल असेल,११ हजार ४३७ शाखा असणार.)

२. युनियन बँक – आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक
(१४.५९ लाख कोटींचे भाग भांडवल असेल,९ हजार ६०९ शाखा असणार.)

- Advertisement -

३. अलाहाबाद बँक – इंडियन बँक
(८.८ लाख कोटींचे भाग भांडवल असेल.)

४. कॅनरा बँक, सिंडिकेट बँक
(१५.२० लाख कोटींचे भाग भांडवल असेल, १० हजार ३३४ शाखा असणार.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -