घरदेश-विदेशमुस्लिमांवर अत्याचारांवरून अमेरिकेने चीनवर केली टीका

मुस्लिमांवर अत्याचारांवरून अमेरिकेने चीनवर केली टीका

Subscribe

चीन मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकाने चीनवर टीका केली आहे. अमेरिकेचे राज्य सचिव माइक पोम्पेओ यांनी चीनवर टीका केली आहे.

अमेरिका हे जगभरातील मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचे वक्तव्य चीनकडून अनेकदा करण्यात आले आहे. अमेरिकेत मुस्लिमांची अवस्था वाईट असल्याचे आरोप करत अमेरिकेचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न चीन करताना अनेकदा दिसून आले आहे. मात्र चीनमध्ये एका मुस्लीम कैद्याला जबदस्ती डुकराचे मांस खायला घालण्याचा प्रकार समोर आल्यानंतर अमेरिकेकडूनही चीन कसून टीकेबाजी झाली आहे. अमेरिकेचे राज्य सचिव माइक पोम्पेओ यांनी ही टीका केली. चीनचा “लज्जास्पद ढोंगीपणा” समोर आला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. चीनमधील बिजींग येथील तरुंगातून बाहेर आलेल्या मुस्लीम कैद्याच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यासंबधीत त्यांनी ट्विटही केले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकार 

चीनमधील तुरुंगात एका मुस्लीम कैद्यावर अत्याचार करण्यात आला होता. मुस्लीम असूनही या कैद्याला जबरदस्ती डुकराचे मांस खाण्यास दिले जात होते तसेच चीनी भाषेत बोल्याची सक्तीही केली जात होती. चीनचे राष्ट्रगीत सुरु असताना या कैद्यांना भिंतीकडे तोंड करून उभे ठेवण्यात येत होते. अशा प्रकारचे आरोप या कैद्याने चीनमधून बाहेर पडून केला होता. यानंतर चीन मुस्लिमांवर अत्याचार करते ही माहिती समोर आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -