घरदेश-विदेशआरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार - एम. जे. अकबर

आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार – एम. जे. अकबर

Subscribe

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री अकबर यांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. आपल्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे हे आरोप असून आपण याच्याविरोधात कारवाई करणार असल्याचेही ते म्हटले आहेत.

#MeToo चळवळी मार्फत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर काही महिला पत्रकारांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना अकबर यांनी फेटाळले असून आरोप करणाऱ्यांविरोधात आपण कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या देशात #MeToo चळवळ तीव्र झाली असून मोठमोठ्या सिनेस्टार आणि राजकीय नेत्यांचे नावे समोर येत आहेत. याच चळवळी अंतर्गत अकबर यांच्यावर काही महिला पत्रकाराने लैंगिक शोषणचे आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाले अकबर?

माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. शिवाय, हे आरोप जाणीवपूर्वक करण्यात आले असून निवडणूकांच्या अगोदरच का हे आरोप होऊ लागले? यामागे काही अजेंडा आहे का? असे प्रश्न विचारत त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारा हा आरोप असून या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

आज सकाळीच आले भारतात

एम जे अकबर यांच्यावर काही महिला पत्रकारांनी #MeToo चळवळी मार्फत लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अकबर हे विदेश दौऱ्यावर गेले होते. आज सकाळीच ते भारतात आले. ते नायजेरियाला गेले होते. भारतात विमानतळावर आल्यावर पत्रकारांशी बोलताना आपण याप्रकरणावर लवकरच स्पष्टीकरण देणार असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – #MeToo वादळ मोदी सरकारमधील मंत्र्याचा बळी घेणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -