घरताज्या घडामोडीकेरळने वाढवलं देशाचं टेन्शन; देशातील ५१.५१ टक्के कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये

केरळने वाढवलं देशाचं टेन्शन; देशातील ५१.५१ टक्के कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज, मंगळवारी अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख उतरताना दिसत आहे, मात्र काही राज्यांमधील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. गेल्या आठवड्यात देशात जेवढ्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामध्ये ५१.५१ टक्के केसेस फक्त केरळमधल्या नोंद झाल्या आहेत, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, आता देशातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांहून कमी झाली आहे. देशात आता ३ लाख ८८ हजार ५०८ सक्रीय प्रकरणे आहेत.

- Advertisement -

तसेच पुढे आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आता देशातील रिकव्हरी रेट ९७.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात गेल्या २ आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट २ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट १.८७ टक्के आहे. ११ राज्यांमधील ४४ जिल्हे असे आहेत, जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांहून अधिक आहे. यात केरळच्या १० जिल्ह्यांचा समावेश आहे. ६ ईशान्यकडील राज्य मणिपूर, मिझोरमा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि सिक्किममधील एकूण २९ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान केरळ आणि तामिळनाडूसह ९ राज्यांमधील ३७ जिल्ह्यात गेल्या २ आठवड्यात कोरोना केसेस वाढताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात ९ ऑगस्टपर्यंत ८६ डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्ण आढळले होते. यात ३४ डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रातून समोर आले आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -