घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाला हरवण्यासाठी एक कोटींहून अधिक योद्धे सज्ज!

CoronaVirus: कोरोनाला हरवण्यासाठी एक कोटींहून अधिक योद्धे सज्ज!

Subscribe

कोरोना विषाणूच्या या युद्धात जीवाची पर्वा न करणाऱ्या योद्धांची यादी केंद्र सरकारने ऑनलाईन जाहीर केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागांच्या कर्मचाऱ्यांची राज्यनिहाय आणि जिल्हावार माहिती उपलब्ध करू सरकारने दिली आहे. सरकारने सव्वा कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. तसंच केंद्र सरकारने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक संस्थांना आवश्यकतेनुसार या योद्धांना घेण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन डेटा पोल नुसार पेन्शन मंत्रालयाने तयार केली आहे. हा सर्व डेटा https://covidwarriors.gov.in वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, देशभरातील विविध भागातून १ कोटी २४ लाख ८५ हजार ६५९ योद्धे कोरोनाच्या लढाईत सामील झाले आहेत. त्यापैकी ९ लाख २७ हजारहून अधिक एमबीबीएस डॉक्टर आहेत. याशिवाय १७ लाखांहून अधिक नर्सेस, दोन लाखांहून अधिक दंतवैद्य आणि आठ लाखांहून अधिक आयुष वैद्य उपलब्ध झाले आहेत. यामध्ये स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सना देखील सामील करण्यात आले आहे.

- Advertisement -

वैद्यकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त माजी कर्मचारी, पंचायत सेवक, आशा कामागार, अंगणवाडी सदस्य यांनाही कोरोना योद्धांच्या यादीत स्थान देण्यात आले आहेत. एनसीसीपासून ग्राम रोजगार सेवक आणि पंचायत सचिवांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा – मौलाना सादचा तबलीगींना संदेश, म्हणे सरकारला सहकार्य करा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -