घरताज्या घडामोडीपालघर मॉब लिंचिंग प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका - मुख्यमंत्री

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका – मुख्यमंत्री

Subscribe

पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून, गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयतन करीत आहे मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. त्यामुळे पालघरमध्ये झालेल्या मॉब लिचिंगची घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नका, पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

पालघर मॉब लिंचिंग विषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ही घटना घडली ते ठिकाण पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. दोन साधू दुर्गम भागातून जात होते सरळ मार्गाने जाता येत नाही. हे काहीही घडवून आणण्यात आलेले नाही. जे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे तिथे काही मीटरवर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. त्या परिसरात गेले काही दिवस अशी अफवा आहे तिथे चोर फिरत आहेत. त्या सगळ्या गैरसमजातून हा प्रकार घडला. हा भाग पालघर पासून ११० किमी अंतरावर आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि दिवसभरात १०० पेक्षा जास्त लोकांना पकडले , त्यात ९ अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले.

दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा याप्रकरणी निलंबितही करण्यात आले आहे. या ठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे असे  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -