घरदेश-विदेशनोटाबंदी नंतरही २००० च्या सर्वाधिक बनावट नोटा जप्त; NCRB ची कारवाई

नोटाबंदी नंतरही २००० च्या सर्वाधिक बनावट नोटा जप्त; NCRB ची कारवाई

Subscribe

मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. काळा पैसा देशात परत आणण्यासाठी भाजप सरकारने रातोरात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास देशवासियांना सांगितले होते. तसेच चलनात असलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हादेखील त्याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. मात्र गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (NCRB) वार्षिक अहलावातून ही माहिती मिळाली आहे.

गेल्या वर्षी बनावट नोटा पकडल्या जाण्याच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून देशात २५.३९ कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. तर २०१८ मध्ये १७.९५ कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्याच एनसीआरबीच्या आकडेवारीवरून समोर आले असल्याचे ‘दि हिंदू’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यांनी ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. तसेच १००, ५०० च्याही नव्या नोटा आणल्या. दरम्यान, २०० च्या नोटा बाजारात आणण्यात आल्या. या नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक अतिमहत्त्वाची फीचर असल्याचेही सांगण्यात आले होते. एनसीआरबीनुसार २०१९ मध्ये २ हजार रूपयांच्या ९० हजार ५६६ बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २३ हजार ५९९ इतक्या २ हजार रूपयांच्या बनावट नोटा केवळ कर्नाटकातून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर गुजरातमधून १४ हजार ४९४ आणि पश्चिम बंगालमधून १३ हजार ६३७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

हेही वाचा –

नाशिक क्रेडाई करणार बांधकाम कामगारांना कुशल व समर्थ : स्किलिंग उपक्रमाचा शुभारंभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -