घरदेश-विदेशजेसोफेनला लिहिलेल्या नेपोलियनच्या प्रेमपत्रांचा ५,१३,००० युरोमध्ये लिलाव

जेसोफेनला लिहिलेल्या नेपोलियनच्या प्रेमपत्रांचा ५,१३,००० युरोमध्ये लिलाव

Subscribe

१७९६ ते १८०४ या काळात लिहिलेल्या या प्रेम पत्रांना ५,१३,००० युरो म्हणजे ३ कोटी ९८ लाख अशी विक्रमी किंमत लिलावात मिळाली.

फ्रान्सचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणरा नेपोलियन बोनापार्ट याने आपली पत्नी एंप्रेस जेसोफेनला लिहलेल्या प्रेमपत्रांचा पॅरिसमध्ये लिलाव करण्यात आला. १७९६ ते १८०४ या काळात लिहिलेल्या या प्रेम पत्रांना ५,१३,००० युरो म्हणजे ३ कोटी ९८ लाख अशी विक्रमी किंमत लिलावात मिळाली. ही प्रेमपत्र नेपोलिअनने १७९६ साली इटलीच्या मोहिमेवर असताना त्यानेआपल्या पत्नीला लिहीली होती.

असे लिहीले होते पत्रात..

इटलीच्या मोहिमेदरम्यान लिहीलेल्या एका प्रेमपत्रात नेपोलिअनने असे लिहीले होते की, ‘सखे, गेल्या काही दिवसांत तुझ्याकडून कोणतंच पत्र मिळलं नाही. कदाचीत तू नक्कीच कुठल्या तरी महत्त्वपूर्ण कामात मग्न असशील. म्हणूनच तू पतीला पत्र लिहिले नाहीस. पण, तुझा पती त्याच्या व्यग्र कामकाजातही फक्त तुझाच विचार करत असतो.’

“मेरी प्यारी दोस्त, तुम्हारी ओर से कोई पत्र नहीं मिला। जरूर कुछ खास चल रहा है, इसलिए आप अपने पति को भूल गई हैं। काम और बेहद थकावट के बीच में केवल और केवल आपकी याद आती है।’’
- Advertisement -

नेपोलियन आणि जेसोफेन यांचा विवाह मार्च १७९६ साली झाला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राचा देखील लिलाव करण्यात आला होता. या प्रमाणपत्राला ९३ लाख ४२ हजार रुपये इतकी किंमत मिळाली होती. काही इतिहास तज्ञांच्या मते प्रमाणपत्रावरील तारीख ८ मार्च १९९६ असली तरी त्यांचा विवाह कोणा दुसऱ्याच दिवशी झाला होता. त्यांच्या लग्नाची नोंदणी पॅरीस येथे झाली होती. नेपोलिअन आणि जेसोफेन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असले तरी ते दोघे पक्के व्यवहारी होते. लग्नानंतर दोघांनी काही कायदेशीर करार केले होते. त्या करारात पती व पत्नी एकमेकांच्या कर्जास जबाबदार राहणार नाहीत. तसेच एकमेकांच्या संपत्तीवरही हक्क दाखवणार नाही अशी विचीत्र कलमे लिहीली गेली होती. १७व्या शतकात त्यांची गाजलेली प्रेमकथा शेवटी मुल न झाल्याने १८०९ साली संपुष्टात आली. १६ डिसेंबर १९०९ साली त्यांनी घटस्फोट घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -