घरदेश-विदेशModi Bhutan Visit : पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भूतानचे नागरिक रस्त्यावर; 45 किलोमीटरपर्यंत...

Modi Bhutan Visit : पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भूतानचे नागरिक रस्त्यावर; 45 किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

Subscribe

नवी दिल्ली : भारतातील लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आणि निवडणूक रॅलींच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. हिमालयीन देशाची राजधानी थिंपू येथे पोहोचल्यावर मोदींचे ‘गार्ड ऑफ ऑनर’ने स्वागत करण्यात आले. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी मोदींचे स्वागत केले आणि ‘मोठा भाऊ’ म्हणून संबोधित केले. विशेष म्हणजे विमानतळ ते थिंपू या 45 किलोमीटरच्या मार्गावर भूतानचे नागरिक पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमले होते. (Narendra Modi Bhutan Visit Citizens of Bhutan on the streets to welcome Prime Minister Modi Queues stretched up to 45 kilometers)

हेही वाचा – Lok Sabha 2024 : सांगली लोकसभेमुळे मविआत वादाची ठिणगी, नाना पटोलेंनी व्यक्त केली नाराजी

- Advertisement -

‘शेजारी प्रथम’ या धोरणाखाली भारत भूतानसोबतचे संबंध सुधारत आहे. याचपार्श्वभूमीवर मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. पारो विमानतळावर मोदींसाठी रेड कार्पेटही अंथरण्यात आले होते. याशिवाय पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ ते थिंपू या 45 किलोमीटरच्या मार्गावर भूतानचे नागरिक पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमले होते. 45 किलोमीटरच्या मार्गावर भारत आणि भूतानचे राष्ट्रध्वज नागरिकांनी फडकावले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये ‘ग्याल्टसेन जेटसन पेमा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल’चे उद्घाटन करणार आहेत. भारत सरकारच्या मदतीने हे रुग्णालय बांधण्यात आले आहे. मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. राजा जिग्मे सिंगे वांगचुक हे 1972 ते 2006 अशी सलग 34 वर्षे देशाचे राजे होते. तसेच या भेटीदरम्यान, द्विपक्षीय आणि प्रादेशिक हिताच्या मुद्द्यांवर एकमेकांशी विचार सामायिक केले जातील आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणासाठी काम केले जाईल.

हेही वाचा – Maha Politics : भाजपासोबत राज ठाकरेंच्या युतीला मुंबईतील उत्तर भारतीयांचा विरोध; या सेनेने दिले आव्हान

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यात नरेंद्र मोदी भूतानच्या मुलांची भेट घेताना दिसत आहेत. ज्यांनी हातात भारत आणि भूतानचे झेंडे घेतले होते. लहान मुले मोदींच्या पुढे चालत आहेत आणि त्यांनी त्यांच्या खांद्यावर हातही ठेवला आहे. यादरम्यान भूतानचे लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करत असून गाणी गाताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -