घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : अभिनेता गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात? मुख्यमंत्री शिंदे देणार उमेदवारी

Lok Sabha 2024 : अभिनेता गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात? मुख्यमंत्री शिंदे देणार उमेदवारी

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोठी खेळण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर पश्चिम लोकसभेसाठी अभिनेता गोविंद याची भेट घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघात 20 मे 2024 ला निवडणूक पार पडणार आहे. अद्यापही मुंईतील सहाही लोकसभांमधील लढत स्पष्ट झालेली नाही. परंतु, काही उमेदवारांची नावे समोर आली आहेत. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पहिल्या उमेदवाराचे नाव समोर आले. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. परंतु, महायुतीला अद्यापही उमेदवार मिळाला नसल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोठी खेळण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर पश्चिम लोकसभेसाठी अभिनेता गोविंद याची भेट घेतल्याचे सांगण्यात आले आहे. (Actor Govinda is likely to be nominated by Shiv Sena from Mumbai North West Lok Sabha)

हेही वाचा… Loksabha 2024: शिर्डीत उद्धव ठाकरेंना धक्का; भाऊसाहेब कांबळेंचा शिंदे गटात प्रवेश

- Advertisement -

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदाचे नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या अनुशंगानं अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता गोविंदा हा याआधी याच मतदारसंघातून निवडणूक लढला होता आणि तो विजयी देखील झाला होता.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाला काँग्रेसच्या तिकीटावर या लोकसभेतून उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी त्याची लढत ही भाजपाच्या राम नाईकांशी झाली होती. परंतु, त्यावेळी गोविंदाने भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर पश्चिम लोकसभेत आपले वर्चस्व निर्माण करता आले होते. त्यामुळे आता अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदा प्रभावी लढत ठरू शकतो का? ठाकरेंकडून रिंगणात उतरलेला उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांचे पुत्र अमोल किर्तीकरांना गोविंदा शह देणार का? अशा अनेक गोष्टींची शिवसेनेकडून चाचपणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -