घरदेश-विदेशSatyapal Malik : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्यपाल मलिकांचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे...

Satyapal Malik : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्यपाल मलिकांचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे त्यात?

Subscribe

नवी दिल्ली : कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ई़डीने अटक केल्यानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे म्हटले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव तसेच अन्य नेत्यांनी या कारवाईवर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

हेही वाचा – Baramati Loksabha: महायुतीत तणाव! पक्षाचं ऐकत नसल्याने विजय शिवतारेंवर होणार शिस्तभंगाची कारवाई?

- Advertisement -

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना एकूण दहा समन्स बजावले होते, मात्र तरीही ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. अशातच, आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्‍च न्‍यायालयात केली होती. यावर गुरुवारी सुनावणी झाली. तथापि, केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर काही तासांतच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

यावर विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर करण्यात येत असल्याचे सांगत खासदार शरद पवार यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. त्यातच सत्यपाल मलिक यांनी गेल्यावर्षी केलेल्या भाकिताची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा दावा त्यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत केला होता. त्यांचा हा दावा खरा ठरला आहे. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – SC : एखाद्याला खटल्याशिवाय तुरुंगात ठेवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाने ईडीला सुनावले

खु्द्द सत्यपाल मलिक यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मोदी सरकार निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असे मी 10 महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता त्यांनी सांगितले की, सत्तेत बसलेला हुकूमशहा भ्याड असून देशाच्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून मोदी सरकारने आपल्या अंताची सुरुवात केली आहे.

हेही वाचा – Kejriwal : आपण स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहोत हे…, आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -