घरदेश-विदेशNarendra Modi : 'एकच प्रॉडक्ट अनेकदा लाँच करूनही दुकान बंद'; राहुल गांधींना...

Narendra Modi : ‘एकच प्रॉडक्ट अनेकदा लाँच करूनही दुकान बंद’; राहुल गांधींना मोदींचा टोला

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या निमित्ताने मणिपूर ते महाराष्ट्र असा दौरा करत आहेत. (Narendra Modi Close shop despite launching same product many times Congress Rahul Gandhi tough challenge from Mod)

हेही वाचा – Nashik Crime : 108 बोकडांचा बळी, पार्टी आली अंगलट; आयकरच्या छाप्यात 850 कोटींचं घबाड सापडलं

- Advertisement -

आभार प्रदर्शनाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची चांगली संधी होती, पण ते ती जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. काँग्रेस पक्ष स्वतः अपयशी ठरली, पण विरोधी पक्षातील आश्वासक लोकांनाही त्यांनी उदयाला येण्याची संधी दिली नाही. कारण त्यांना गोंधळ निर्माण होण्याची भीती होती, म्हणून त्यांनी अधिक तेजस्वी लोकांना दाबले, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केली.

विरोधी खासदारांकडे बोट दाखवत मोदी म्हणाले की, ‘अनेक सन्माननीय तरुण खासदार आहेत, ज्यांच्यात उत्साह आहे, पण ते बोलले तर त्यांची प्रतिमा उजळून निघेल आणि कदाचित कोणाची तरी प्रतिमा दडपली जाईल, या चिंतेमुळे तरुण पिढीला संधी मिळू नये, यासाठीच सभागृहाचे कामकाज होऊ दिले जात नाही. एक प्रकारे स्वतःचे (काँग्रेसने), विरोधी पक्षाचे, संसदेचे आणि देशाचे खूप नुकसान केले आहे, असा असा करतानाच मोदी म्हणाले की, मला नेहमीच वाटते की, देशाला चांगल्या आणि निरोगी विरोधी पक्षाची नितांत गरज आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shubman Gill : “दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन केली फलंदाजी”; शतकवीर शुभमन गिलकडून खुलासा

घराणेशाहीचा देशाला फटका

‘घराणेशाही’चा फटका देशासह काँग्रेसला बसला आहे, ‘आमचे मल्लिकार्जुन खर्गे या सभागृहातून त्या सभागृहात गेले आणि गुलाम नबी आझाद पक्षातूनच स्थलांतरित झाले, हे सर्वजण घराणेशाहीचे बळी ठरले आहेत. यानंतर मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता म्हटले की, ‘पुन्हा तेच ते उत्पादन काँग्रेस बाजारात मांडून दुकान उघडत आहे, परंतु त्यांचे दुकानाला कधीच टाळे लागले आहे, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -