घरमुंबईAshok Chavan Nanded: जो मैं बोलता हूँ, वह करता हूँ; प्रचारसभेदरम्यान अशोक...

Ashok Chavan Nanded: जो मैं बोलता हूँ, वह करता हूँ; प्रचारसभेदरम्यान अशोक चव्हाणांची डायलॉगबाजी

Subscribe

प्रचार सभेत अशोक चव्हाण यांनी केलेली डायलॉगबाजीची सर्वत्र चर्चा आहे.

नांदेड: लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागला आहे. जवळपास आता सर्वच जागांवर उमेदवारी जाहीर झालेली आहे. असं असताना प्रचाराला वेग आला आहे. नुकतेच भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. नांदेडमधून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारक यादीत त्यांचं नाव होतं. त्यांनी घेतलेल्या प्रचार सभेत अशोक चव्हाण यांनी केलेली डायलॉगबाजीची सर्वत्र चर्चा आहे. जो मैं बोलता हूँ, वह करता हूँ, असा फिल्मी डायलॉग त्यांनी यावेळी मारला. (Lok Sabha 2024 Ashok Chavan Nanded dialogue during the campaign rally in Nanded of Pratap Patil Chikhalikar)

काय म्हणाले अशोक चव्हाण? (Ashok Chavan Dialogue)

भाजपा नेते अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपाचे जुन लोक आणि काँग्रेसमधून आज भाजपामध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. आपली शक्ती डबल होणार आहे. डबल ताकद झाल्यावर और किसीको देखने की जरुरत नहीं है. प्रतापराव और हम अलग अलग थे. सात से दस साल से वो मेरेको पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नहीं की सामने एक और पिछे एक. जो मैं बोलता हूँ, वो करके दिखाता हूँ. मग ते विकासाचं काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

- Advertisement -

काँग्रेस संपवण्याचा प्लॅन- नाना पटोले

ज्या काँग्रेस पक्षाच्या नावावर तुम्ही, तुमच्या कुटुंबाने राजयोग भोगलं, ज्या काँग्रेस पक्षात राहून पैसे कमावले, मोठी पदे भूषवली, अशी काँग्रेस नावाच्या आईने तुम्हाला मोठं केलं त्याच आईची तुम्ही बदनामी करता, याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्या या कृतीबद्दल लोकं तुम्हाला माफ करणार नाहीत. एकंदरीतच अशोक चव्हाण यांचा महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाला संपवण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात केला आहे.

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : निकाल तुम्हाला आधीच माहीत आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपावर हल्लाबोल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -