घरदेश-विदेशशरद पवार घेणार अमित शहांची भेट, सहकाराच्या विषयावर चर्चा करण्याची शक्यता

शरद पवार घेणार अमित शहांची भेट, सहकाराच्या विषयावर चर्चा करण्याची शक्यता

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज केंद्रीय गृहमंत्री आणि नवे सहकारमत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. या भेटीत राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. या भेटीत सहाकाराच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे या भेटीकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

शरद पवार आज दुपारी २ वाजता संसदेत अमित शहा यांच्या कार्यालयात भेट घेणार आहेत. अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतर शरद पवार-अमित शहा पहिली भेट असणार आहे. सहकार क्षेत्रासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत राज्यातील सहकार क्षेत्रासंदर्भात माहिती देऊ शकतात. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने नव्याने सहकार खातं तयार केलं. यानंतर या खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार खात्याचा अनुभव असलेले अमित शहा यांच्याकडे दिली. तथापि, अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी दिल्याने महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात सर्वाधिक सहभाग असलेल्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर राष्ट्रवादीने देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. तसंच, काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांचा कारखाना ईडीने जप्त केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या शरद पवार-अमित शहा भेटीत नेमकं काय होतं? कोणत्या विषयावर चर्चा होते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -