घरदेश-विदेशदेशात आणखी धावणार नव्या नऊ वंदे भारत ट्रेन; 11 राज्यांना पंतप्रधानांकडून भेट

देशात आणखी धावणार नव्या नऊ वंदे भारत ट्रेन; 11 राज्यांना पंतप्रधानांकडून भेट

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वंदे भारत एक्सप्रेस देशाला समर्पित केल्या असून, त्यांनी अभासी पद्धतीने वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली : देशांतर्गंत प्रवास आणखी जलद व्हावा यासाठी पंतप्रधान मोदी नवनवीन योजना आणत आहेत. पुढी काही दिवस बुलेट ट्रेन धावणार असून, या बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम सुरू आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी नऊ वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली असून, त्या नऊ वंदे भारत ट्रेन देशातील 11 राज्यात धावणार आहेत. (New nine Wande Bharat trains will run more in the country 11 states visited by Prime Minister)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वंदे भारत एक्सप्रेस देशाला समर्पित केल्या असून, त्यांनी अभासी पद्धतीने वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या नऊ ट्रेन राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांमध्ये धावणार आहेत. या सुपर फास्ट गाड्या त्यांच्या मार्गावरील सर्वात वेगवान गाड्या असतील आणि प्रवाशांचा बराच वेळ वाचविण्यात मदत करणार आहेत.

- Advertisement -

वंदे भारत ट्रेन देशाच्या प्रत्येक भागाला जोडणार

वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वंद भारत या रेल्वेंनी देशाच्या पर्यटन आणि आर्थिक घडामोंडीमध्येसुद्धा गती आली आहे. आज देशाचा जो आत्मविश्वास वाढला आहे तो मागील अनेक दशकांपेक्षा अधिक आहे. तर देशातील अनेक रेल्वे स्टेशनचे संचालन महिला करीत आहेत. याचा अभिमान वाटत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप सरकार रेल्वेचा प्रवास आणखी सुखकर करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. वंदे भारत ट्रेनसुद्धा त्याचाच एक भाग आहे. वंदे भारत ट्रेन देशातील गरीब आणि मध्यम श्रेणीतील लोकांना विश्वासाची वाटत आहेत. एका दिवसात जेवढे लोक या ट्रेनने प्रवास करतात तेवढी तर काही देशांची लोकसंख्यासुद्धा नाही असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा : कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त रोजगार…, पर्यटनाला चालना देण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन

- Advertisement -

रेल्वेच्या सर्वकश विकासाकडे सरकारचे लक्ष

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी रेल्वे विभागाला आधुनिक करण्याकडे लक्षच दिले नाही. मात्र, आमचे सरकार आता रेल्वेला अत्याधुनिक बनविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी रेल्वेच्या आधीच्या बजेटपेक्षा विद्यमान सरकारने कोट्यवधी रुपयांची वाढ केली असल्याचेही ते म्हणाले. तर रेल्वेला अत्याधुनिक बनविण्यासाठी आणि अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर झळकले

या 11 राज्यांत धावणार वंदे भारत ट्रेन

लॉंच करण्यात आलेल्या वंदे भारत रेल्वे या राजस्थान, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, तेंलगणा, कर्नाटक, बिहार, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या राज्यातील मार्गावरून धावणार आहे.

सणासुदीच्या आधी मोठी भेट

पुढील काही दिवसांत बंगळुरू आणि हैदराबाद दरम्यानची काचीगुडा-यशवंतपूर ट्रेन सेवा ही दोन शहरांदरम्यान सर्वात कमी प्रवास वेळेसह धावणारी सर्वात वेगवान ट्रेन असणार आहे. त्याचप्रमाणे विजयवाडा-एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गावरील वंदे भारत ट्रेन या मार्गावरील पहिली आणि वेगवान ट्रेन असणार आहे. दरम्यान आगामी सणांचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -