घरक्राइमNIA : देशभरात 19 छापे आयसिसशी संबंधित 8 संशयित अतिरेकी अटकेत

NIA : देशभरात 19 छापे आयसिसशी संबंधित 8 संशयित अतिरेकी अटकेत

Subscribe

एनआयएच्या पथकाने कर्नाटकाच्या बेल्लारी, बंगळुरू, झारखंडमधील जमशेदपूर, बिफरे, दिल्ली, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे अमरावती देखील एनआयएने छापे टाकले.

मुंबई : ISIS विरोधात एनआयए ऑक्शन मोडमध्ये आली आहे. आज एनआयएने देशातील चार राज्यात छापे टाकले असून आठ संशयित अतिरिक्यांना अटक आहे. या छापेमारीत एनआयएने स्फोटकांचा कच्चा माल, शस्रास्त, लॉपटॉप यासह काही कागदपत्रे जप्त केली आहेत.

एनआयएच्या पथकाने कर्नाटकाच्या बेल्लारी, बंगळुरू, झारखंडमधील जमशेदपूर, बिफरे, दिल्ली, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे अमरावती देखील एनआयएने छापे टाकले. तसेच पुण्यातील गुलटेकडी परिसरातील एका तरुणांची एनआयएने चौकशी केली. साफवान शेख असे या तरुणांचे नाव आहे. ते पुण्याच्या अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. साफवान हा इसिसच्या मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई एनआयएच्या बंगळुरूच्या पथकाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CM Eknath Shinde : वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अमरावतीत शिक्षकाच्या मुलाला एनआयएकडून चौकशी

तसेच अमरावती असलपूरमध्ये एनआयएने छापे टाकले आहे. यात 19 वर्षाच्या तयब नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणांची चौकशी सुरू असून या तरुणांकडून एनआयएला काही कागद पत्र आणि लॉपटॉप हाती लागले आहे. हा तरुण व्हॉसअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनाच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. अचलपूर जुना शहरातील अबकारी चौकात एका शिक्षकाच्या मुलाला एनआयए पथकांनी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. हा शिक्षकांचा मुगला नागपूरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून एनआयए ही त्यांच्या कारवाईवर लक्ष ठेवून होती.

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -