घरदेश-विदेशनोकऱ्यांबाबत तुम्हालाही मेसेज येतायत? मग सावधान; NICने दिला 'हा' इशारा

नोकऱ्यांबाबत तुम्हालाही मेसेज येतायत? मग सावधान; NICने दिला ‘हा’ इशारा

Subscribe

आजकाल अनेकांना नोकऱ्यांबाबत विविध ऑफर्सचे मेसेज येत आहेत, जर तुम्हालाही असे मेसेज ( SMS) येत असतील तर सावधान. कारण अशा मेसेजेमधील लिंक किंवा नंबरवर क्लिक करणे तुम्हाला महागात पडू शकते. याबाबत आता नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (NIC) नागरिकांना इशारा दिला आहे. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या नावासह नोकरी देण्याचे आश्वासन दिले जात आहे.

दरम्यान बनावट जॉब ऑफर मेसेजसंदर्भातील समोर आलेल्या प्रकरणांनंतर NIC ने अॅडव्हायजरी जारी केली आहे. या मेसेजमध्ये एनआयसीच्या नावाचा गैरवापर करत ते मेसेज मोठ्या प्रमाणात लोकांना पाठवले जायचे. याबाबत शुक्रवारी संबंधीत मंत्रालयाने एका निवेदन जारी करत म्हटले की, बनावट मेसेजसंदर्भात माहिती मिळताच तत्काळ अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली, ज्यामध्ये हे उघड झाले की, बनावट मेसेज एनआयसीमार्फत पाठवले जात नव्हते.

- Advertisement -

एनआयसीच्या नावाचा गैरवापर करून बनावट मेसेज सायबर पाठवत फसवणुक केली जात आहे. एनआयसीने सांगितले की, बनावट एसएमएसमुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. या एसएमएसबद्दल माहिती मिळाल्यावर, NIC ने तत्काळ CERT-In ला घटनेची माहिती दिली आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीकडे तक्रार केली.

कारवाईसाठी CERT-In शी संपर्क साधा

अशा बनावट एसएमएस आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी NIC ने CERT-In मधून फसव्या URL काढून टाकण्यासाठी समन्वय साधला. CERT-In ही सायबर सुरक्षेतील हल्ल्यांना प्रतिसाद देणारी राष्ट्रीय नोडल एजन्सी आहे.

- Advertisement -

तुम्हीही करा याठिकाणी तक्रार

केंद्रीय गृह मंत्रालयाने अलीकडेच तरुणांना सुचना केली होती की, ऑनलाइन नोकरीच्या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून तरुणांना सतर्क करण्यासाठी काही संकेत दिले होते. यात तात्काळ नोकरीचे अपॉटमेंट लेटर मिळणे, त्वरित ईमेल येणे या गोष्टींचा समावेश आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, लोकांना चुकीचा ईमेल मिळाल्यास ते सायबर क्राईम विंगला कळवू शकतात. यासाठी नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in वर तक्रार करता येईल.


सायरस मिस्त्रीप्रकरणी महिला चालकाविरोधात गुन्हा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -